August 6, 2026

अट्टल घरफोड्या रिजवान मुंबई नाका पोलिसांच्या ताब्यात…

0

अट्टल घरफोड्या रिजवान मुंबई नाका पोलिसांच्या ताब्यात…nnनाशिक लोकल सतीश रुपवतेnसंशयित आरोपीचा सीसीटीव्ही फुटेज हाती लागला आणि मुंबई नाका पोलिसांची चक्र फिरली. एका गोपनीय बातमीदाराच्या आधारे पोलिसांनी संशयित आरोपी रिजवान मलंग शहा याचा शोध सुरू केला. रिजवान शहा अट्टल घरफोडे आहे.याने तब्बल मुंबई नाका हद्दीत चार घरफोड्या केल्या आहेत. वय वर्ष 23 राहणार कृषी नगर बबलू कुरेशीच्या घरासमोर वडाळा नका नाशिक याच पत्त्यावर राहत असलेला रिजवान मलंग शहा याला मुंबई नाका पोलिसांनी अटक केली. रिझवान ने मुंबई नाका पोलीस हद्दीत चार घरफोड्या केल्याची कबुली पोलिसाना दिली आहे त्याच्याकडून 13 तोळे सोने पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मुंबई नाका पोलीस स्टेशन हद्दीत गुन्हेगारी वाढली असली तरी गुन्ह्यांची उकल करण्यात मुंबई नाका पोलीस स्टेशन अग्रेसर आहे. पोलीस आयुक्त जयवंत नाईकनवरे पोलीस उपआयुक्त किरण चव्हाण सहाय्यक पोलीस आयुक्त दिपाली खन्ना यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई नाका पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील रोहकले गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक चंद्रकांत अहिरे के.टी रौंदळ सोमनाथ गेगझे व्ही आर सोनार समीर शेख आप्पा पनवळ विश्वास साळुंखे राजेंद्र नाकोडे यांची भरीव कामगिरी दिसून आली. रिजवान शेख न्यायालयासमोर हजर केले असता त्यास पोलीस कोठडी देण्यात आली आहे अशी माहिती मुंबई नाका पोलिसांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *