October 7, 2026

पाईप फुटल्याने हजारो लिटर पाणी वाया चांदवड

0

नाशिक लोकल सतीश रुपवते nचांदवड शहरातील होळकर शाळा रोड येथे पाईपलाईन फुटल्याने हजारो लिटर पाणी वाया जात आहे. येथे दोन ठिकाणी पाईपलाईन फुटलेली असून या पाईपलाईन मधून पाण्याची मोठी धार लागलेली आहे. यामुळे या रस्त्यात सर्वत्र पाणीच – पाणी झालेले आहे व चिखल तयार झालेला आहे. हा वाहतुकीचा रस्ता असल्याने या रस्तावर खूप मोठ्या प्रमाणात रहदारी असते. या रस्त्यावरून नागरिकांची व विद्यार्थ्यांची सतत वर्दळ असते.n उन्हाळ्यात चांदवड शहरात मोठ्या प्रमाणात दुष्काळ व पाणीटंचाई असते.नळांना एक ते दीड महिना पाणी येत नाही. यामुळे नागरिकांना व महिलांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते.n चांदवड शहरात नवीन नळजोडणी करण्यात आलेली असूनही काही ठिकाणी या नव्या नळांना पाणी येत नाही व काही ठिकाणी या नळांना आजही नियमितपणे पाणीपुरवठा होत नाही, परंतु येथे हजार लिटर पाणी वाया जात असल्याने नागरिकांमध्ये संतप्तेचे वातावरण निर्माण झालेले आहे.n या पाईपलाईन मधून हजारो लिटर पाणी वाया जात असल्याची बाब नगरपरिषद अधिकाऱ्यांच्या निदर्शनात असूनही ते याकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करत आहेत.n नगरपरिषद प्रशासनाने ही पाईपलाईन तत्काळ दुरुस्त करावी, अन्यथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ( ऐ ), नाशिक जिल्हा उपाध्यक्ष राजाभाऊ अाहिरे यांच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा यावेळी प्रशासनाला देण्यात आलेला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *