August 6, 2026

पोलिसांच्या हस्तक्षेपाने वाद निवळला

0

नाशिक रोड सतीश रुपवतेnनासिक रोड येथील भालेराव मळ्यात सहा डिसेंबर रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन म्हणून त्यांचा अर्धाकृती पुतळा काही आंबेडकर अनुयायांनी बसवला. यासंदर्भात एका आंबेडकर अनुयायावर गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. संजय भालेराव आणि त्यांच्या दोन सहकाऱ्यांनी विरोधात उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला मात्र आता या प्रकरणाने वेगळे वळण घेतल्या असून विशेष प्रतिनिधीच्या माहितीनुसार पोलिसांनी यात हस्तक्षेप करून मार्ग काढण्याचे आश्वासन आंबेडकरी अनुयायांना दिले आहे. मात्र सदरील जागा ही नाशिक महापालिकेच्या मालकीची असून जागा गार्डन साठी रिझर्वेशन करण्यात आली आहे. या जागेवर विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अर्धकृती पुतळा बसवण्यात आला असून त्याला शासनाच्या चौकटीत कसे बसवायचे हे आवाहन आंबेडकर अनुयायान समोर आहे. या संदर्भातील पाठपुरावा दलित विकास महासंघाचे संस्थापक अध्यक्ष कैलास तेलोरे माजी नगरसेविका सरस्वती भालेराव कानुबाई सुकेनकर मंदा वाघ सरूबाई गंगावणे कल्पना लोखंडे कल्पना सोनवणे सारिका घोडेराव शोभा बागुल संगीता भालेराव धनश्री भोर स्वाती गंगावणे माधुरी सोनवणे विजय भालेराव बिपिन मोहिते प्रशांत भालेराव महेश सुकेनकर सुनील पठारे बाळू सावंत आदि आंबेडकर अन्यायी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा त्याच ठिकाणी राहावा यासाठी लढा देत होते nnn

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *