October 8, 2026

मनपा कर्मचारी व अधिकारांचा रंगला क्रिकेटचा सामना

0

मनपा अधिकारी, कर्मचाऱ्यांचे क्रिकेट सामने रंगले, वैद्यकीय आरोग्य विभागाचा संघ विजेता, 22 संघांचा सहभाग nnमहापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या मार्गदर्शनाखाली क्रीडा विभागाच्या वतीने आज दि.10-12 2022 रोजी अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी क्रिकेटचे सामने आयोजित करण्यात आले होते. मुंबई नाका जवळील बॉक्स क्रिकेट क्लबच्या दोन मैदानांवर (टर्फ) सामने मोठ्या उत्साहात पार पडले. अंतिम सामना नाशिक रोड विभागीय कार्यालयाचा संघ आणि मनपा मुख्यालय राजीव गांधी भवन येथील वैद्यकीय आरोग्य विभागाचा संघामध्ये रंगला. विजेतेपदासाठी संध्याकाळी सहा वाजता हा सामना सुरू झाला. अटीतटीच्या सामन्यात वैद्यकीय आरोग्य विभागाच्या संघाने बाजी मारली. 45 धावांनी विजय मिळवला. 7 ओव्हर मध्ये त्यांनी 2 बाद 117 धावा केल्या होत्या. नाशिक रोड कार्यालय संघाच्या 4 बाद 72 धावा झाल्या. 111 धावा करणारा पंकज कट्यारे उत्कृष्ट फलंदाज ठरला तर सहा विकेट्स घेत यासीन शेख हा उत्कृष्ट गोलंदाज ठरला. तर नगर नियोजन विभागाचा जय गवांदे मालिकावीर ठरला. त्यांने तीन सामन्यांमध्ये 157 धावा केल्या. विजेत्या वैद्यकीय आरोग्य विभागाच्या निखिल कुमावतने एकाच ओव्हरमध्ये सात सिक्स मारत 42 धावा केल्या.nमनपाच्या विविध विभागातील एकूण 22 संघांनी सहभाग घेतला. नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे चार पंच आणि दोन ऑनलाईन स्कोअरर होते. सकाळी दहाच्या सुमारास समाज कल्याण विभागाचे प्रभारी उपायुक्त नितीन नेर यांच्या उपस्थितीत स्पर्धेला सुरुवात झाली. काही संघांमधील सामने अतिशय चुरशीचे झाले. nn **अधिकाऱ्यांचीही फटकेबाजी* nnयावेळी अधिकाऱ्यांनीही क्रिकेट खेळण्याचा आनंद लुटला. घनकचरा व्यवस्थापन विभागाचे संचालक डॉ. आवेश पलोड यांच्या बॉलिंगवर अतिरिक्त आयुक्त अशोक आत्राम यांनी उत्तम बॅटिंग करून फिट असल्याचे दाखवून दिले. यावेळी त्यांनी खेळाडूंना स्पोर्ट्स स्पिरिटबाबत मार्गदर्शनही केले. अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी यांनी जाहिरात व परवाने विभागाच्या संघाकडून खेळताना तडाखेबंद खेळी केली. 23 बॉलमध्ये 37 धावा करताना त्यांनी पाच सिक्स मारले. त्यांच्या फटकेबाजीला सर्वांनीच दाद दिली. याशिवाय डॉ प्रशांत शेटे, डॉ. नितीन रावत, डॉ. योगेश कोशीरे, कार्यकारी अभियंता गणेश मैद, नाशिक रोड विभागीय अधिकारी सुनील आव्हाड, पूर्व विभागीय अधिकारी राजाराम जाधव, घरपट्टी विभाग अधीक्षक योगेश रकटे, सचिन विधाते, जनसंपर्क अधिकारी गिरीश निकम यांच्यासह अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी खेळण्याचा आनंद लुटला. क्रीडा विभागातील आनंद भालेराव आणि नगर नियोजन विभागातील समीर रकटे यांनी स्पर्धेचे नियोजन केले होते. कोरोना काळानंतर प्रथमच क्रीडा स्पर्धा होत असल्याने कर्मचाऱ्यांमध्ये मोठा उत्साह दिसून आला. पुढच्या आठवड्यात बॅडमिंटनसह इतर खेळांच्या सामन्यांचे आयोजन करण्यात येणार आहे.n…………………………………….

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *