न्याय मिळण्यासाठी करणार आत्मदहन
नाशिकच्या पिंपळगाव येथे मराठा समाजानेच मराठा समाजाची जमीन लाटण्याचा प्रकार घडला आहे. वसंत जगन्नाथ चव्हाणके व त्यांची पत्नी एका वसंत चव्हाणके हे वयोवृद्ध दांपत्य आहे आणि यांचीच फसवणूक झाल्याचा प्रकार उघड झाला आहे. सध्या हा परिवार कामगार नगर येथे राहतो. वसंत चव्हाण के यांचे पिंपळगाव बसवंत येथे प्लॉट नंबर एक 201 मध्ये शिवशक्ती फूड प्रॉडक्ट्स म्हणून कंपनी होती समर्थ औद्योगिक वसाहतीतून या कंपनीचा कामकाज चालायचं. ही कंपनी किस्मिस चा प्रॉडक्ट बनवत होती आणि याचे संचालक होते वसंत चव्हाणके. त्या लगतच सावन किंची एक छोटीशी बेकरी ही होती. सदरील कंपनी त्यांच्या मॅनेजर तोडून टाकल्याचा आरोप चव्हाणके यांनी केला आहे. दुकानासमोर असलेले उंबराचे झाड देखील याच मॅनेजर ने तोडून टाकले. व सदरील जागा चव्हाणकेंना विचारात न घेता परस्पर जागा भाड्याने दिली. सदरील जागा रामविलास यादव व त्याचा सहकारी काजी यांना भाडेतत्त्वावर दिली. एमआयडीसी ने पाच वर्ष या जागेचे भाडे देखील घेतले. त्यानंतर सन 2012 मध्ये ही जागा परस्पर विक्री करण्यात आली. वसंत चव्हाणके यांना जागल्या विकल्या संदर्भात कोणतीही कल्पना दिली गेली नाही किंवा विचारपूस सुद्धा करण्यात आली नाही. त्यानंतर चार नोव्हेंबर 2022 रोजी दुय्यम निबंधक यांच्याकडून वसंत चव्हाणके यांना कळविण्यात आले तुमची जागा करार भाडे प्रमाणे देण्यात आली आहे. त्यानंतर लगेचच वसंत चव्हाणके यांनी पोलीस स्टेशन शी संपर्क साधून पोलिसांना ही बाब कळवली. या घटने संदर्भात पोलीस अधीक्षक ग्रामीण निफाड पोलीस स्टेशन पिंपळगाव पोलीस स्टेशन व दुय्यम निबंधक यांना यांना निवेदन देऊन सविस्तर माहिती दिली की माझी मोठ्या प्रमाणात फसवणूक झाली आहे. मात्र हे निवेदन दिल्यानंतर एक महिना उठून गेला अद्याप या प्रकरणाची कुठल्याही प्रकारची दखल प्रशासनाने घेतली नाही. यावलट माझी हरस्मेंट केली जाते असा पोलीस प्रशासनावर वसंत चव्हाणके यांनी आरोप केला आहे या संदर्भात मला न्याय मिळाला नाही तर मी मेहरबान नाशिक जिल्हाधिकारी यांच्या दालनात आत्मदहन करण्याचा इशारा वसंत चव्हाणके कुटुंबीयांनी दिला आहे
