मुख्यमंत्री व सर्व पक्षीय नेत्यांची कर्मवीर दादासाहेब गायकवाड ओझर विमानतळ नामकरण समिती घेणार भेट-अण्णासाहेब कटारे
सतीश रुपवते nनाशिक(प्रतिनिधी):ओझर विमानतळास कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांचे नाव मिळावे म्हणून शासन दरबारी सतत पद्मश्री कर्मवीर दादासाहेब गायकवाड ओझर विमानतळ नामकरण समिती नाशिक च्या वतीने प्रयत्न करीत आहोत.nनाशिक जिल्ह्यातील सर्वच लोकप्रतिनिधी केंद्रीय व राज्य मंत्रिमंडळातील मंत्री, शासकीय अधिकारी यांना समक्ष भेटून समितीच्या वतीने मागणीनामा सादर केलेला आहे सर्वच लोकप्रतिनिधी शासकीय अधिकारी ओझर विमानतळास कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांचे नाव मिळावे म्हणून सकारात्मक भूमिकेत आहे.nदादासाहेब गायकवाड नामकरण समितीची बैठक मुख्य निमंत्रक अण्णासाहेब कटारे यांच्या अध्यक्षतेखाली दि.14 डिसेंबर 2022 रोजी नाशिक शासकीय विश्रामगृह येथे संपन्न झालीnबैठकित सर्वानुमते ठराव पारित करण्यात आला की महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ जी शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र जी फडणवीस, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरदचंद्र जी पवार,शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव जी ठाकरे,काँग्रेस नेते नानासाहेब पटोले,nआदी सर्व पक्षीय नेत्यांची समितीच्या वतीने भेट घेऊन मागणीनामा सादर करण्यात येणार आहे.nकर्मवीर दादासाहेब गायकवाड यांचे नाव ओझर विमानतळास मिळावे या करीता मुंबई स्तरावर जी समिती कार्यरत होती ती समिती देखील आजच्या बैठकीत नाशिक जिल्ह्यात स्थापन असलेल्या पद्मश्री कर्मवीर दादासाहेब गायकवाड ओझर विमानतळ नामकरण समिती, नाशिक मध्ये विलीन करण्याचा ठराव देखील आज बहुमताने मंजूर करण्यात आला.n बैठकीस प्रामुख्याने nरिपब्लिकन नेते तानसेन भाई ननावरे,वंचित आघाडी चे नेते बाळासाहेब जी शिंदे,जिल्हाध्यक्ष पवन भाऊ पवार,रिपाई नेते चिंतामण भाई गांगुर्डे,रिपाई एकतावादी चे आदेश भाऊ पगारे,पत्रकार महादू पवार,अरुण केदारे,रिपब्लिकन नेते दीपक भाई ननावरे,महिला आघाडी नेत्या लक्ष्मी ताई ताठे,कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांचे नातू राजेंद्र गायकवाड ,अर्जुन उघडे,दिनेश पगारे,रिपब्लिकन नेते दिलीप काका प्रधान,सुभाष गोहाडे,रिपब्लिकन नेते मदन अण्णा शिंदे,नेते भिवानंद जी काळे,वंचित शहराध्यक्ष अविनाश शिंदे,रिपब्लिकन वार्ता संपादक डॉ.अनिल आठवले,राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष युवा नेते प्रतीक सोनटक्के,वंचित चे पंडित नेटावटे,विश्वनाथ भालेराव,संजय भालेराव,विजय गांगुर्डे,रुपेश सोनवणे, प्रशांत कटारे,धम्मापाल वाहुळे,इंद्रजित भालेराव,संदीप उन्हवणे,विनोद भालेराव,डी.जी पगारे, आदी उपस्थित होते.
