August 7, 2026

बालाजी हॉस्पिटल मधील लिंग निदान सोनोग्राफी मशीन महापालिकेकडून जप्त

0

nनाशिक सतिश रुपवते nबालाजी हॉस्पिटलवर मनपा आरोग्य अधिकाऱ्यांचा छापा, लिंग निदान होत असल्याचा संशय, सोनोग्राफी मशीन जप्त आली आहे. श्री बालाजी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, देवळाली गाव, नाशिकरोड येथे अनाधिकृत सोनोग्राफी मशीन आढळून आले असून या रुग्णालयात बेकायदेशीर लिंग निदान हॊत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे . या प्रकाराने आरोग्य प्रशासन हादरले आहे. पालिकेच्या आरोग्य अधिकाऱ्यांच्या पथकाने शुक्रवारी टाकलेल्या छाप्यात हा प्रकार उघडकीस आला. डॉ राजेंद्र भंडारी आणि डॉ सुनीता भंडारी यांच्या मालकीचे हे हॉस्पिटल असल्याचे या हॉस्पिटल मध्ये असलेल्या फलकावरून निष्पन्न झाले. येथील अनधिकृत सोनोग्राफी मशीन असल्याची तक्रार पालिका प्रशासनाकडे प्राप्त झाली होती. त्यानुसार ही कारवाई झाल्याचे पालिका आरोग्य अधिकारी डॉ बापूसाहेब नागरगोजे यानी यावेळी दिली. या कारवाईत सोनोग्राफी मशीन सिल करण्यात आले असून पुढील कारवाई चौकशी अंती केली जाईल अशी माहितीही त्यांनी दिली.चौकशी पुर्ण झाल्यानंतरच या रुग्णालयात बेकायदेशीर लिंग निदान सुरु होते किंवा कसे? लिंग निदान होत असेल तर आजवर किती प्रकरणे झाली? यात कुणा कुणाचा सहभाग होता? अशा प्रश्नांची उत्तरे मिळणार आहेत.nnचौकटnलिंग निदान सोनोग्राफी मशीन मुळे श्री यांचे प्रमाण कमी झाल्या असल्याचे निदर्शनास आले आहे. यामुळे स्त्रियांवरील लैंगिक अत्याचार वाढले आहेत. त्यामुळे लिंगनिदान सोनोग्राफी मशीन बंद होणे गरजेचे आहे असे न झाल्यास स्त्रियांवरचे अत्याचार अधिक प्रमाणात वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *