October 8, 2026

१२०० क्षयरुग्णांना पोषण आहार देण्याची गरज : मनपा

0

मनपा रुग्णालयातील क्षयरुग्णांना निक्षय मित्रांमार्फत पोषण आहार देण्याबाबत बैठक संपन्न, nnप्रधानमंत्री क्षयरोग मुक्त भारत अभियान अंतर्गंत क्षयरुग्णांना पोषण आहार देण्यासाठी आज दि.१६/१२/२०२२ रोजी मा. आयुक्त तथा प्रशासक डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक पार पडली. यावेळी अतिरिक्त आयुक्त अशोक आत्राम यांनी क्षयरुग्णांना पोषक आहार देण्यासाठी समाजातील दानशूर व्यक्ती, संस्था यांनी सामाजिक बांधिलकी जपत क्षय रुग्णांचे ‘निक्षय मित्र’ व्हावे, असे आवाहन केले. मनपाच्या सहाय्यक आरोग्य अधिकारी तथा शहर क्षयरोग अधिकारी डॉ. कल्पना कुटे यांनी प्रस्ताविक केले. सद्यस्थितीत मनपा कार्यक्षेत्रात १२०० क्षयरुगणांना पोषण आहार देण्याची आवश्यकता आहे. क्षयरोग नियंत्रण विभागामार्फत रुग्णालयनिहाय रुग्णांची माहिती ‘निक्षय मित्र’ यांना देण्यात येईल. त्यानुसार पोषण आहाराचे वाटप करण्यात येईल, अशी माहिती दिली. यावेळी जागतिक आरोग्य संघटना सल्लागार डॉ. हर्षद लांडे यांनी पोषण आहार बास्केट, शासनाच्या मार्गदर्शक सूचना, पोषण आहाराची आवश्यकता याबाबत मार्गदर्शन केले. वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे यांनी बैठकीत उपस्थितांच्या प्रश्नांचे आणि शंकेचे निरसन केले. नियोजन करून योग्य प्रकारे आहार वाटपाची अंमलबजावणी करण्यात येईल, अशी ग्वाही दिली. बैठकीला उपस्थित सर्व मान्यवरांनी क्षयरुगणांना पोषण आहार देण्यास संमती दर्शविली आहे. nया बैठकीसाठी सामाजिक कार्यात सहभागी असलेल्या संस्थांचे प्रतिनिधी माजी नगरसेवक जगदीश पाटील, गुरमित बग्गा, सलीम शेख, दीक्षा लोंढे, अमोल पाटील, ‘इंडोलाईन’च्या सपना पाटील, अंबड इंडस्ट्रियल असोसिएशनचे सचिव ललित बुब, रोटरी क्लबच्या अध्यक्षा सोनल रॉय, स्वर्गीय हरी भाऊ गीते फाउंडेशनच्या दिपाली गिते, कमल फाऊंडेशनचे औटे, डिशचे श्रीकांत कुलकर्णी, आयएपीचे अध्यक्ष डॉ. केदार मालवतकर, नरडेको अध्यक्ष अभय तातेड, सचिव सुशील गावडे, मनीषा विसपुते तसेच समता सामाजिक विकास संस्था आणि रोटरी क्लब वेस्ट या संस्थांचे प्रतिनिधी बैठकीला उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *