अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई एक कोटी 95 लाखाचा गुटखा केला जप्त
सतीश रुपवते नाशिक इगतपुरीnगुरुनानक ढाबा परिसर , वाडीवऱ्हे, तालुका इगतपुरी येथे अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई करण्यात आली आहेnआज दि. 29/12/2022 रोजी डिसेंबर 2022 रोजी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे अन्न व औषध प्रशासन विभागातील अधिकारी यांनी पाठलाग करून व सापळा रचून गुरुनानक ढाबा परिसरात दोन मोठे कंटेनर पकडून झाडाझडती केली असता त्यात मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित अन्न पदार्थांचा साठा आढळून आला. पैकी एका वाहनातून आरोपी पळून जाण्याचा प्रयत्न करीत असताना अधिकाऱ्यांनी फिल्मी स्टाईल ने त्याचा 1 किलोमीटर पर्यंत पाठलाग करून त्याच्या मुसक्या आवळल्या. वाहन क्र.RJ 06 GB 5203 या कंटेनर मधून SHK Premium या गुटक्याचा एकूण 1,50,54,000/- किमतीचा साठा जप्त करण्यात आलेला आहे. तसेच वाहन क्र. RJ 09 GB 0472 या कंटेनर मधून SHK Premium, Safar व 4K (STAR) या ब्रँडचा एकूण 45,33000/- किमतीचा साठा जप्त करण्यात आलेला आहे. अशा प्रकारे दोन्ही कंटेनर मिळून एकूण 1,95,87000/- रु किंमतीचा प्रतिबंधित अन्न पदार्थांचा साठा व अंदाजे 30 लाख किमतीचे दोन कंटेनर अन्न औषध प्रशासनाने जप्त करून वाडीवऱ्हे पोलिसांच्या ताब्यात पुढिल कारवाईसाठी दिले आहेत. तसेच वाडीवऱ्हे पोलीस ठाण्यात भा. द. वि. कलम 328, 272,273,188 व अन्न सुरक्षा मानदे कायद्यातर्गत FIR ची नोंद करण्याची प्रकीया सुरूआहे . पुढिल तपास वाडीवऱ्हे पोलीस ठाणे करीत आहे. सदरची कारवाई अन्न व औषध प्रशासनाचे मा. मंत्री महोदय श्री. संजयजी राठोड, प्रशासनाचे आयुक्त मा. अभिमन्यू काळे, अन्न औषध प्रशासनाचे सह आयुक्त श्री गणेश परळीकर, सहायक आयुक्त श्री उदय लोहकरे, श्री मनिष सानप यांचे मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी श्री गोपाल कासार व श्री अमित रासकर यांनी केलेली आहे.
