August 6, 2026

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना जयंतीदिनी पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने अभिवादन..

0

नाशिक; क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना जयंतीदिनी पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने अभिवादन..nnआज दि 3 जानेवारी 2023 रोजी,स्त्री शिक्षणासाठी आपले जीवन वाहणाऱ्या ज्ञानज्योती भारतातील पहिल्या महिला शिक्षिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना नाशिक येथे पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय नेते प्रा.जोगेंद्र कवाडे सर, जयदीपजी कवाडे आणि प्रदेशाध्यक्ष गणेशभाई उन्हवणे यांच्या आदेशाने पक्षाच्या वतीने अभिवादन करण्यात आले.nयावेळी पीआरपी नाशिक जिल्हाध्यक्ष शशीभाई उन्हवणे आणि ज्येष्ठ साहित्यिक साराभाई वेळूंजकर यांनी फोटोस पुष्पहार अर्पण केला. आणि सावित्रीबाई फुले यांच्या बलिदानाची थोडक्यात आठवण करून दिली. nयावेळी पीआरपीचे राज निकाळे, रवी पगारे, नवनाथ कातकडे, जावेद शेख, बिलाल शेख, हाबिद शेख, शादाब शेख, मोबीन खान, शाहरुख खान, अलाउद्दीन अंसारी, देविदास पवार, नवनाथ माने, गणेश भालेराव, प्रशांत पाटील, महादू पाटील, बाळासाहेब डांगरे, सुनिता कर्डक, अलका निकम, मीना पगारे, दयाबाई काळे, लक्ष्मी गडगडे आदी पुरुष व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *