August 6, 2026

महिलांना वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडणाऱ्या दोन संशयित आरोपींना पोलिसांकडून बेड्या …. पी सी बी एम ओ बी मध्यवर्ती गुन्हे शाखेची कारवाई

0

महिलांना बळजबरीने वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडणाऱ्या दोघा जणांना उपनगर पोलिसांनी अटक केली आहे. सदर कारवाई नाशिक शहर व गुन्हे शाखे पथकाने केले आहे. मसाज पार्लरच्या नावाखाली देह विक्रीचा व्यापार धंदा सुभाष केदारे व त्याचा साथीदार सागर माने करीत होते. उत्तर प्रदेश आसाम अशा परराज्यातून श्रिया नाशिकमध्ये आणून उपनगर मधील नाशिक पुणे रोडवरील जय भवानी रोड येथे टीव्हीएस शोरूम समोर उपनगर नाका नाशिक रोड येथील प्रियदर्शनी गेस्ट रूम येथे सदरचा देह विक्रीचा व्यवसाय चालू होता. एका गुप्त माहितीच्या आधारे नाशिक पोलिसांनी या अवैद्य वेश्या व्यवसायावर छापा मारून तीन महिलांना मुक्त केले आहे.nमसाज पार्लरच्या नावाखाली सदर वेश्याव्यवसाय चालू असल्याची माहिती पोलिसांना होती सुभाष केदारे व सागर माने असे दोन तरुण हा व्यवसाय चालवत असल्याची बाप पोलिसांच्या लक्षात आली एका खापऱ्याच्या मार्फत ही माहिती पोलिसांना मिळतात पोलिसांनी सदर ठिकाणी छापा टाकून आरोपींना वेड्या ठोकले आहेत संशयित आरोपी सुभाष केदारे व सागर माने पोलिसांच्या ताब्यात आहेत तीन महिलांना या व्यवसायातून मुक्त करण्यात आली ची माहिती पोलिसांनी दिली. संशयित आरोपीने विरोधात पोलिसांनी भादवि क्रमांक 370/34 सह अनैतिक प्रतिबंधक कायदा कलम तीन चार पाच सात अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास उपनगर पोलीस स्टेशनचे अधिकारी करीत आहेत.nया कारवाईत वरिष्ठ पोलीस निरीक्षक आंचल मुदगल धर्मराज बांगर माणिक गायकर नितीन फुलपगार अभिजीत पवार दत्तात्रेय कन्नूर शंकर गोसावी सुनील भालेराव दिलीप धुमणे शेरखान पठाण श्रीराम सपकाळ किशोर देसले बाळू बागुल संजय गमने समीर चंद्र मोरे दीपक पाटील गणेश वाघ संदीप पवार सरिता सातपुते प्रीती कातकडे नीलिमा निकम युवराज कानमहाले अतुल पाटील प्रजित ठाकूर वैशाली घरटे आदींनी कामगिरी पार पाडले. सदर गुन्ह्याचा तपास उपनगर पोलीस करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *