October 8, 2026

नाशिक जिल्ह्यातील वंचित परिवर्तनवादी इतिहास पुस्तकाचे प्रकाशन : लेखक गणेश दादासाहेब रूपवते

0

नाशिक जिल्ह्यातील वंचितांचा परिवर्तनवादी इतिहास या ग्रंथात लेखक डॉ. गणेश दादासाहेब रूपवते यांनी सामाजिक बदलाचा आढावा घेतला आहे . अनेक स्त्रियांची नावे चर्चा या ग्रंथात आली असून, स्त्री शिक्षण,कामगार चळवळ, या विषय उत्तम भूमिका लेखक डॉ.गणेश रुपवते यांनी मांडले आहे. यामुळे हे पुस्तक नसून ग्रंथ असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ समीक्षक लहू गायकवाड यांनी केले. दादासाहेब बिडकर कला वाणिज्य महाविद्यालय पेठच्या वतीने आयोजित प्रा. डॉ. गणेश दादासाहेब रूपवते यांच्या नाशिक जिल्ह्यातील वंचित परिवर्तनवादी या पुस्तकाच्या प्रकाशन वेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ कामगार नेते करुणासागर पगारे होते . व्यासपीठावर डांग सेवा मंडळाच्या अध्यक्षा हेमलता बिडकर प्रा. इंदिराताई आठवले मृणाल जोशी प्राचार्य मंजुषा कुलकर्णी प्रा. रागिनी रुपवते प्रा. गंगाधर अहिरे प्रा.उमेश पठारे शंकर बोराडे प्राचार्य भामरे राजू देसले आदी मान्यवर उपस्थित होते. पुस्तक प्रकाशनावेळी हेमलता बिडकर म्हणाल्या मला ज्या गोष्टी माहित नव्हतं त्या पुस्तकातून कळाल्या इतकंच नव्हे तर सटाणा तालुकाला बागलाण का म्हणतात याचा उलगडाही या पुस्तकातून वाचताना होतो. वंचितांचा परिवर्तनवादी इतिहास या पुस्तकाच्या प्रकाशनावेळी लेखकाची आई कृष्णाबाई दादासाहेब रूपवते देखील उपस्थित होत्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *