अवघ्या दोन तासात केला खूनचा तपास. पंचवटी पोलिसांचे कामगिरी.
नाशिक सतिश रुपवते nअवघ्या दोन तासात पंचवटी पोलिसांनी केला खुनाचा तपास.nदिंडोरी नाका परिसरात सोमवारी सायंकाळी पावणे सातच्या सुमारास किरण गुंजाळ नामक रेकॉर्डवर असलेल्या गुन्हेगाराचा खून झाल्याची घटना समोर आली होती. किरण गुंजाळ रेकॉर्डवरील गुन्हेगार होता. किरण मिरची विक्रीचा व्यवसाय करायचा. किरण गुंजाळ चा भाऊ अनिल गुंजाळ याचीही चार वर्षांपूर्वी चार-पाच जणांच्या ठोक्याने पेठ रोडच्या तेलंगवाडी परिसरात खून केला होता. त्याच पद्धतीने किरण गुंजाळलाही तोडक्याने हल्ला करून जीवे ठार मारण्याचा प्रकार घडला आहे. खून करून संकेत आरोपी फरार झाले होते. मात्र पंचवटी पोलिसांनी सीसीटीव्ही च्या आधारे खुनातील संशयित आरोपी नितीन पांडुरंग साबळे वय 21 राहणार शनी मंदिर पेठ रोड पंचवटी , देवा उत्तम पाटील वय 22 राहणार राजवाडा निमानी बस स्थानकाजवळ पंचवटी, दीपक रामण्णा वरती वय 23 राहणार गजानन चौक कामट गल्ली पंचवटी नाशिक अशा तिघा संशितांना पंचवटी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सदर गुन्ह्याबाबत पंचवटी पोलिसांनी तपास केला असता मयत किरण गुंजाळ व संशोध आरोपींमध्ये बाचाबाची झाली होती किरकोळ वाद झाला होता या वादाचे परिवर्तन हाणामारीत झाले संशयित आरोपींकडे असलेल्या चाकूने किरण गुंजाळ यांच्या मानेवर वार करून पोटात वार करण्यात आल्याची माहिती संशयित आरोपींनी पोलिसांना दिली. तिघा संशोध आरोपींनी विरोधात पंचवटी पोलीस ठाण्यात भा.द.वी 302 /34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर कुणाच्या घटनेचा तपास रणजीत नलवडे करीत आहेत. घटनेचा तपास पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण पोलीस उपआयुक्त प्रशांत बच्छाव पंचवटी विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त गंगाधर सोनवणे पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सिताराम कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करण्यात आला. अवघ्या दोन तासात पोलिसांनी खुनाचा तपास पूर्ण करून संशयतांना ताब्यात घेतले उद्या संशयित आरोपींना न्यायालयासमोर हजर करणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
