August 7, 2026

पेठ रोड येथे युवकाचा खून पंचवटी हद्दीतील घटना..

0

पेठरोड येथे युवकांचा खुनnनाशिक : वार्ताहर n दिंडोरी नाका परिसरात सोमवारी (दि ५) सायंकाळी ६.४५ वाजता किरण गुंजाळ (रा. पेठरोड) या युवकाची भररस्त्यात प्राणघातक शस्त्राने वार करत निर्घृण खून करण्यात आला आहे. किरणच्या भावाचाही २०१८ मध्ये खून झाला होता. nअत्यंत वर्दळीच्या रस्त्यावर झालेल्या या रक्तरंजित घटनेने पोलिसांसमोर आव्हान उभे राहिले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिस उपायुक्त किरणकुमार चव्हाण, सहाय्यक आयुक्त गंगाधर सोनवणे, पोलिस निरीक्षक डॉ. सीताराम कोल्हे, रणजीत नलावडे घटनास्थळी दाखल झाले. मारेकऱ्यांचा शोध पोलिसांकडून शोध घेतला जात आहे. होळी सणाच्या पार्श्वभूमीवर सदर घटना घडल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *