August 7, 2026

टेम्पो चालकास लुटणारे तिघे ताब्यात

0
    n

  •  nnनाशिक : वार्ताहरnnटेम्पो च्या पाठीमागे दुचाकी लावत तिघां संशयितांनी फिर्यादीस धमकावत पैसे व मोबाईल लंपास केला होता. या प्रकरणी इंदिरानगर पोलीसाच्या गुन्हे शोध पथकाने ३ संशयितांना ताब्यात घेतले आहे. टेम्पोच्या पाठीमागुन आलेल्या दुचाकीवरील ट्रिपल सीट बसुन आलेल्या तिघांनी  टॅम्पोला ओव्हरटेक करत  टॅम्पोच्या पुढे वाहन आडवे लावत . टेम्पो चालक फिर्यादी अजगर अली अकबर अली अन्सारी (रा. पळसे ता. जि.नाशिक) यास तु माझे कड़े काय बघतो अशी कुरापत काढुन त्यास हाताचापटीने मारहाण खिश्यातुन १० हजार रोख रक्कम व विवो कंपनीचा मोबाईल फोन बळजबरीने काढुन घेत फरार झाले होते. याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. इंदिरानगर पोलिस ठाणेच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक मार्गदर्शनाखाली इंदिरानगर पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथकाचे अधिकारी व अमलदार यांनी सीसीटीव्ही कॅमेरेचे फुटेज तपासुन गुप्त माहितीच्या आधारे संशयित १) दिलीप उध्दव प्रधान वय २६ वर्षे, २) राजेश भगवान जावळे उर्फ टकल्या वय २८ वर्षे व ३) मोहीत मुकुंदा काळे वय २६ वर्षे सर्व रा. पाथर्डीगांव नाशिक यांना ताब्यात घेतले. द्वारका सर्कल येथुन ताब्यात घेतले आले आहे. या गुन्हयांचा पुढील तपास पोलीस निरिक्षक देवोदास वांजळे (गुन्हे) व हवालदार समाधान खांडेकर इंदिरानगर पोलीस ठाणे हे करीत आहे.
  • n

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *