August 6, 2026

१९६ महात्मा फुले जयंती ची कार्यकारणी जाहीर अध्यक्ष अंबादास खैरे

0

*महात्मा फुले जयंती उत्सव समिती अध्यक्ष पदी अंबादास खैरे, कार्याध्यक्ष पदी रवी हिरवे तर महिला अध्यक्षपदी तेजश्री काठे*nnn*नाशिक,दि ७ मार्च :-* महात्मा फुले जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी अंबादास खैरे, कार्याध्यक्ष पदी रवी हिरवे तर महिला अध्यक्षपदी तेजश्री काठे यांची एकमताने निवड करण्यात आली. तिथी प्रमाणे ११ एप्रिल रोजी महात्मा फुले यांची जयंती साजरी करण्यात येत असून जयंती उत्सव समितीच्या अध्यक्ष व कार्यकारणी निवड करण्यासाठी रविवारी शहरातील माळी मंगल कार्यालय येथे बैठक घेण्यात आली.nn nदि.११ एप्रिल रोजी महात्मा फुले यांची १९६ वी जयंती साजरी होत असून यानिमित्त जयंती उत्सव समितीची बैठक पार पडली सदर बैठकीत कार्यकारणीची निवड सर्वानुमते करण्यात आली. nnnयात नाशिक शहर जयंती उत्सव समिती अध्यक्ष पदी अंबादास खैरे, कार्याध्यक्षपदी शशी हिरवे, उपाध्यक्षपदी राकेश शेवाळे, शंतनु शिंदे, तुषार विधाते, खजिनदार शरद मंडलिक, संदिप गांगुर्डे, यांची निवड करण्यात आली.nn तर नाशिक रोड विभाग अध्यक्ष पदी -nसंजय रासकर, ज्ञानदेव जाधव, सरचिटणीस भास्कर जेजुरकर, कार्यालयीन सचिव विलास वाघ, संघटक कृष्णकुमार गायकवाड, नाना नाईकवाडे , मिलिंद गांगुर्डे, महिला अध्यक्षपदी तेजश्री काठे यांची नियुक्ती करण्यात आली.nnnसिडको विभाग – अध्यक्ष पदी रवींद्र शिंदे, पाथर्डी फाटा विभाग गणेश खोडे, सातपूर विभाग अध्यक्ष भरत जाधव, मध्य नाशिक अध्यक्ष सागर बेदारकर, द्वारका विभाग अध्यक्ष पदी सचिन काठे, पंचवटी विभाग रामेश्वर साबळे, धात्रक फाटा विभाग सचिन खोडे, nnमखमलाबाद विभाग दीपक मंडलिक, सोशल मीडिया प्रमुख पदी अभिजीत राऊत, संतोष पुंड , संदीप खैरे, महेश ढोले यांची सर्वांनुमते निवड करण्यात आली.nn यावेळी जेष्ठ मार्गदर्शक बाजीराव अण्णा तिडके ,तांबे मामा, ज्ञानेश्वर महाजन, संदीप शिंदे, डॉक्टर श्याम पगार , प्रेमलता जुन्नरे, मंगला जाधव, ज्ञानेश्वर समासे गणेश राखुंडे, खैरे वकील, मच्छिंद्र माळी, दादाजी अहिरे, राकेश विधाते, दिनेश झुटे, संजय भडके, संजय वाघ, बाळासाहेब गांगुर्डे, विनोद मोहन, सार्थक रासकर, गोरख वाघ, अभिषेक शिंदे, स्वप्निल फुले, गिरीश बच्छाव, पंकज वसतकार आदींसह मोठ्या संख्येने समाज बांधव व मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *