October 9, 2026

ख्रिस्ती समाजाचा आज महामूकमोर्चा

0

ख्रिस्ती समाजाचा आज महामूकमोर्चाnnनाशिक, ता, ८ : ख्रिस्ती समाजावरील अन्याय, अत्याचार, सातत्याने होणारे धर्मांतराचे आरोप, ख्रिस्ती संस्थांबाबत सापत्नभावाची वागणुकीचा निषेध नोंदविण्यासाठी महामूकमोर्चा आयोजित केला आहे. गुरुवारी (ता. ९) सकाळी नऊला शरणपूर येथील संत आंद्रिया चर्चपासून मोर्च्याला सुरवात होणार आहे. मोर्च्यानंतर पाच जणांचे शिष्टमंडळ जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन निवेदन देतील, अशी माहिती मोर्चाचे अध्यक्ष रेव्ह. प्रवीण घुले यांनी दिली. संत आंद्रिया चर्चपासून मोर्चा निघताना किशोर सुधारालय, जिल्हा रूग्णालय, तरण तलाव, जुने पोलिस आयुक्त कार्यालय, शरणपूर मार्केट, संत आंद्रिया चर्च असा मोर्चाचा मार्ग आहे. संत आंद्रिया चर्च कंपाउंडमध्ये होणाऱ्या सभेने मोर्चाची सांगता होईल. मोर्चा सुरू असताना रहदारीला अडथळा न करता कॅनडा कॉर्नर, सीबीएस, त्र्यंबक नाका, तरण तलाव, शरणपूर पोलिस चौकी आदी सिग्नलवर ख्रिस्ती बांधव हातात फलक घेऊन निदर्शने करतील, असे मोर्चाचे उपाध्यक्ष रूपेश निकाळजे, सचिव गिरीश भालतिडक, सहसचिव अभय म्हस्के, खजिनदार नॉव्हेल मथायस, संघटक वॉल्टर कांबळे यांनी कळविले आहे. तसेच देवेंद्र शिंदे, फिलिप वरा, विशाल त्रिभुवन, अआर्थर जेबराज, विजय वानखेडे, समीर गायकवाड, भारतभूषण लोखंडे, रवी वैरागर, राणी पवार, अमोल नाडे, संजय अहिर, धर्मेंद्र वानखेडे, पेत्रस बत्तीसे,शारलेट नाडे, राजू कुऱ्हाडे,राहुल साळवे,अजय श्रीवास्तव व सर्व चर्चेसचे तरुण संघ ह्यांनी मूक महामोर्चा यशस्वी पार पाडण्यासाठी सहकार्य करीत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *