August 7, 2026

शहर पोलीसांच्या ताफ्यात १७ नवी वाहने

0

 nnनाशिक : वार्ताहरnnशहर पोलीस आयुक्तालयात नव्याने १७ चारचाकी वाहने दाखल झाली आहेत. या वाहनांमुळे शहरातील पोलिसांची पेट्रोलिंग गस्त वाढीस वेग मिळणार आहेत . नव्याने दाखल झालेली वाहने सहायक पोलीस आयुक्तांची कार्यालये, पोलीस ठाणे व गुन्हे शाखेच्या पथकांना मिळणार आहेत. नाशिक पोलीस आयुक्तालयाकडे सध्या २०० चारचाकी, १०० दुचाकी आहेत. आता नव्याने १७ चारचाकी, ७ डायल ११२ साठी दाखल झाले आहे. त्यामुळे वाहनसंख्या ३३४ वाहन झाली आहे. पोलीस आयुक्तालयामार्फत महामार्ग सुरक्षा आणि गस्ती पथकांना वाहने मिळावीत, यासाठी वर्षभरापासून जिल्हा नियोजन समितीकडे पाठपुरावा सुरु होता. तत्कालीन पोलीस आयुक्त जयंत नाइकनवरे यांनी १७ वाहनांची मागणी प्रस्तावाद्वारे केली होती. त्याला मंजुरी मिळाल्याने शहर पोलिसांच्या ताफ्यात नवी १७ वाहने दाखल होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *