शेतकऱ्यांसाठी दहा तारखेला राष्ट्रवादी रस्त्यावर
कांदा, द्राक्ष पिकांसह भाजीपाल्याचे पडलेले बाजारभाव व दुसरीकडे वाढत असलेली महागाई यामुळे शेतकरी व सर्वसामान्य नागरिक अडचणीत सापडला आहे. या पार्श्वभूमीवर *चांदवड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने शुक्रवार दि.१० मार्च २०२३ रोजी सकाळी १० वाजता पेट्रोलपंप चौफुली मुंबई आग्रा महामार्ग चांदवड येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनास माजी खासदार समीर भुजबळ यांची प्रमुख उपस्थिती असणार असून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहे. असे आवाहन राष्ट्रवादीकडून करण्यात आले आहे.
