नाशिककरांसाठी अर्थसंकल्प निराशा जनक : अंबादास खैरे
अर्थसंकल्पातून नाशिकच्या पदरी निराशा – अंबादास खैरे nशिंदे फडणवीस सरकारने राज्याचा अर्थसंकल्प जाहीर केला. मात्र राज्याचा अर्थसंकल्प निराशा जनक असल्याचे वक्तव्यात राष्ट्रवादीचे अंबादास खैरे यांनी केले. अर्थसंकल्पातून नाशिककरांना काही मिळाले नाही असा निराशा जनक आशावाद त्यांनी व्यक्त केला. राज्याच्या अर्थमंत्र्यांनी आज सादर केलेल्या अर्थसंकल्पातून नाशिकच्या पदरी पुन्हा एकदा निराशा पडली आहे. नाशिक पुणे रेल्वे, नाशिक नियो मेट्रोसह प्रकल्पांना निधी देऊ असे म्हटले आहे. मात्र किती निधी देणार यामध्ये स्पष्टता नाही. जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकरी अडचणी असतांना त्यांना मदत घोषित करण्याची आवश्यकता होती. ती देखील झालेली नाही. त्यामुळे हा अर्थसंकल्प नाशिककरांची घोर निराशा करणार अर्थसंकल्प असल्याची प्रतिक्रिया अंबादास खैरे यांनी दिली आहे.
