October 8, 2026

महिलांनीच केला महिला दिन महापालिकेत साजरा.

0

नाशिक महानगरपालिका मुख्यालय राजीव गांधी भवन येथे आज दि. 8 मार्च रोजी जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. अतिरीक्त आयुक्त (सेवा) भाग्यश्री बानायत यांच्या हस्ते विविध विभागातील महिला कर्मचा-यांचा गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी काही महिला कर्मचा-यांनी मनोगत व्यक्त करताना स्त्री-शक्तीची उदाहरणे देत आजच्या काळातली महिला कुटुंब आणि नोकरी या दोन्ही गोष्टी समर्थपणे पेलत असल्याकडे लक्ष वेधले. भाग्यश्री बानायत यांनी ‘सुपर वुमन सिंड्रोम’ या मुद्यावर बोलताना विविध जबाबदा-या सांभाळताना कुटुंबातील महिलेचं स्वत:कडेच कसे दुर्लक्ष होतं याकडे लक्ष वेधलं. यावेळी सहाय्यक वैद्यकीय अधिकारी डॉ. अजिता साळुंखे, घनकचरा व्यवस्थापन विभाग संचालक डॉ. कल्पना कुटे यांचाही अतिरीक्त आयुक्त भाग्यश्री बानायत यांच्या हस्ते ट्रॉफी आणि गुलाबपुष्प देऊन सन्मान करण्यात आला. डॉ. कुटे आणि डॉ. साळुंखे यांनीही यावेळी उपस्थित कर्मचा-यांशी संवाद साधून महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या. मनपाच्या समाज कल्याण विभाग अंतर्गंत महिला व बालकल्याण विभागाने कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी विभागाचे उपायुक्त नितीन नेर, संतोष मुंढे उपस्थित होते. जनसंपर्क अधिकारी गिरीश निकम यांनी सुत्रसंचालन केले. समाज कल्याण विभागातील महेश आटवणे, आनंद भालेराव, राजश्री जैन, हेमांगी जाधव, स्मिता निरभवणे यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी सहकार्य केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *