August 8, 2026

मोबाईल चोर अटकेत

0

 nnनाशिक : वार्ताहरnभद्रकाली पोलिसांनी मोबाईलची चोरी करणार्‍या चोरटयास अटक केली. त्यांच्या कडुन ४७ हजार ७०० रूपये किंमत असलेले १२ मोबाईल हस्तगत केले.nचौकमंडई परिसरातून रविवारी (दि ३) रोजीnरिक्षाचालक भागचंद गणेश लध्दड ( वय ६७, व्यवसाय रिक्षा बालक, रा. देवळाली गांव) यांच्याnखिशातील सॅमसंग कंपनीचा मोबाईल फोन जबरी चोरी करून चोरून नेला होता. या प्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्ता पवार यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाने शितळा देवी मंदिर अमरधाम रोड परिसरातुन इम्रान हनिक पठाण (वय २९, रा. विनयनगर ) यास ताब्यात घेतले. पोलीस चौकशी दरम्यान संशयितांनी भद्रकाली परिसरातुन 12 मोबाईल चोरीची कबुली दिली.nपुढील तपास पोलीस निरीक्षक किशोर खांडवी करीत आहेत. सदरची कामगिरी पोलिस आयुक्त अंकुश शिंदे, उपायुक्तपरिमंडळ १ किरणकुमार चव्हाण, सहाय्यक आयुक्त डॉ. सिध्देश्वर धुमाळ , भद्रकाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्ता पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक (गुन्हे) दिलीप ठाकुर, गुन्हे शोध पथकाचे किशोर खांडवी, उपनिरीक्षक भुषण देवरे, संदिप शेळके, विशाल काठे, श्रीकांत पाटील, संजय पोटींदे आधीच्यापथकाने केली .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *