वाढत्या महागाई विरोधात वंचित बहुजन 18 ला रस्त्यावर.
महागाईसह विविध प्रश्नांसाठी 18 मार्चलावंचित बहुजन आघाडीतर्फे नाशकात मोर्चा महानगरप्रमुख अविनाश शिंदे यांची माहितीnनाशिक- वाढती महागाई,कांद्याचे गडगडलेले भाव,शेतकऱ्यांच्या शेतमालाला मिळत असलेला मातीमोल भाव,राज्यातील तसेच नाशकातील ढासळलेली कायदा व सुव्यवस्था स्थिती याकडे जनतेचे लक्ष वेधण्यासाठी वंचित बहुजन आघाडीतर्फे शनिवार दि.18 मार्चरोजी गोल्फ क्लब मैदान ते जिल्हाधिकारी कार्यालय असा भव्य मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती आघाडीचे महानगराध्यक्ष अविनाश शिंदे यांनी दिली.n वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक शुक्रवारी पार पडली.त्यात हा निर्णय घेण्यात आला.घरगुती गॅस आणि व्यावसायिक गॅसच्या किमतीत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने त्याचा परिणाम महागाई वाढण्यात झाला आहे. त्यामुळे खाद्यपदार्थांचे तसेच वाहतुकीचे दरही आसमानाला भिडले आहेत.सर्वसामान्यांचे बजेट अक्षरशः कोलमडून पडले आहे.शेतमालाचे भाव कोसळल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यातच कांदा कवडीमोल भावाने विकावा लागत असल्याने शेतकऱ्यांना कोणी वालीच उरलेला नाही अशी स्थिती निर्माण झाली आहे.राज्यातील कायदा व सुव्यवस्था स्थिती ढासळली आहे. नाशकात तर दिवसाढवळ्या खुनाच्या घडत nअसल्याने सर्वसामान्यांचे जगणे मुश्किल झाले व त्यांची सुरक्षितताही धोक्यात आली आहे त्यामुळे या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी 18 मार्चचा मोर्चा असल्याचे अविनाश शिंदे यांनी पुढे नमूद केले.n चुंचाळे गावाला तसेच सातपूर मधील प्रबुद्ध नगर ला स्लमचा दर्जा द्यावा चुंचाळे घरकुल घरकुल योजना परिसरातील अवैध धंद्यांना आवर घालावा,अंबड पोलीस स्टेशनचे विभाजन करून आणखी एक स्वतंत्र पोलीस स्टेशन निर्माण करावे मागण्या सुद्धा या मोर्चाच्या माध्यमातून धसास लावण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे असेही निवेदनात पुढे म्हटले आहे सदर मिटींगला उत्तर महाराष्ट्राचे महासचिव वामनदादा गायकवाड माजी नगरसेवक संजय साबळे महानगर प्रमुख अविनाश शिंदे महासचिव संदीप काकडीच सातपूर विभागीय अध्यक्ष बजरंग शिंदे सिडको विभागीय अध्यक्ष अनिल आठवले मध्य विभागीय अध्यक्ष दामोदर पगारे नाशिक रोड विभागीय अध्यक्ष महेश भोसले भरत भालेराव विकी साळवे बंटी थोरात विशाल पाडमुख दीपक पगारे सुनील साळवे विनोद दोंदे अमोल घोडे बाबा सावंत ज्ञानेश्वर अभंग शिवनाथ अहिरे जितेंद्र साळवे राजू गोतीस खंडू वाघ गणेश रोकडे कैलास गांगुर्डे आधी शहराचे पदाधिकारी हजर होते
