August 9, 2026

त्र्यंबकच्या भूमिअभिलेख विभागातील दोघा अधिकाऱ्यासह एका एजंटला लाच घेतांना पकडले

0
    n

  1. n

nनाशिक : वार्ताहरnnत्र्यंबकच्या भूमिअभिलेख विभागातील दोघा अधिकाऱ्यासह एका एजंटला तब्बल तीन लाखांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागnपथकाने रंगेहाथ पकडले. १० लाख रुपयांच्या लाचेची मागणी करून तडजोडीअंती ३ लाख रुपयांच्या लाचेची मागणी केल्या प्रकरणी त्र्यंबकेश्वर भूमी अभिलेख उप अधीक्षक कार्यालयातील २ जणांसह एका खासगी इसमाविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली आहे. भुमी अभिलेख कार्यालयातील शिरस्तेदार दौलत नथू समशेर (वय ४३, रा. फ्लॅट नं ६, चैत्र चंद्र अपार्टमेंट, समर्थ नगर, वडाळा पाथर्डी रोड, इंदिरा नगर, गोकुळ हॉस्पिटल जवळ, नाशिक), भूकमापक भास्कर प्रकाश राऊत, (वय ५६, रा. रो हाऊस नं ३, ४, रामकुंज अपार्टमेंट, रामकृष्ण नगर, राम मंदिर जवळ, चुंचाळे शिवार, अंबड नाशिक) व खाजगी इसम वैजनाथ नाना पिंपळे, (वय ३४, रा. रो हाऊस नंबर १, ऋषिराज रो हाऊस, शांतीनगर, मखमलाबाद रोड, नाशिक) लाच मागणाऱ्या तिघे  आहेत. तक्रारदाराचे फायनल लेआऊटमध्ये त्रुटी दाखवत शेजारील गटातील क्षेत्र तक्रारदार यांचे गटात सरकून न देण्याच्या मोबदल्यात समशेर व राऊत यांनी तक्रारदारकडे २९ डिसेंबर २०२२ रोजी १० लाख रुपये लाचेची मागणी केली. तक्रारदार तयार न झाल्याने ११ जानेवारी २०२३ रोजी ६ लाख रुपये लाच मागितली शेवटी तडजोडी अंती १६ जानेवारी २०२३ रोजी ३ लाख रुपयांची लाचेची मागणी करून पिंपळे याने ही रक्कम स्वीकारण्याचे मान्य केले. तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. तिघांवर कारवाई करण्यात आली. सदर ककारवाई अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर घारगे, अपर पोलीस अधीक्षक नारायण न्याहाळदे, पोलीस उपअधीक्षक नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गायत्री मधुकर जाधव, पोलीस निरीक्षक संदीप घुगे, पोलीस निरीक्षक अनिल बागुल, पो ना. प्रकाश महाजन, पो. ना. किरण अहिरराव, पो. ना. अजय गरुड, यांच्या पथकाने केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *