October 10, 2026

सावित्रीबाई फुले महिला पुरस्काराने सन्मान.

0

नाशिक विजय खडागळे nnनाशिक: सौजन्य महिला विकास संस्थेच्या वतीने देण्यात येणाऱ्या सावित्रीबाई फुले महिला पुरस्कार वितरण व स्मरणिका प्रकाशन सोहळा सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतीदिनानिमित्त नाशिक शहरातील औरंगाबाद सभागृहात पार पडला. यावेळी प्रमुख पाहुणे मालेगाव येथील डी. वाय. एस.पी. लता दोंदे, बाल न्याय मंडळाच्या सदस्य शोभा पवार, व्ही एन नाईक संस्था नाशिक प्रतिनिधी नयना आव्हाड, महिला सक्षमीकरण व्याख्याता भक्ती गोडसे, महाराष्ट्र राज्य पतसंस्था उपकार्याध्यक्षा ऍड अंजली पाटील, डॉ शीतल चव्हाण, सिनेआभिनेते धनंजय वाबळे उपस्थित होते. nभारताच्या विकासात महिला विकास हा महत्त्वाचा आहे जोपर्यंत महिलांचा सर्वांगीण विकास होत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने प्रगती झाली असे म्हणता येणार नाही. महिलांचे विविध प्रश्न अडचणी लक्षात घेऊन त्यांच्यासाठी विविध उपक्रम राबवावे या हेतूने गेल्या पाच वर्षांपासून “सौजन्य महिला विकास संस्था कार्य करत आहे”. यावेळी नुपूर डान्स ग्रुप कडून विविध सांस्कृतिक नृत्य करण्यात आले. विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा सावित्रीबाई फुले महिलारत्न पुरस्कारा देऊन सन्मान करण्यात आला . nयावेळी प्रमुख मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले nसपना कदम बाईट यावेळी जिजामाता भोसले , अहिल्यादेवी होळकर यांची भूमिका साकारलेल्या महिलांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमासाठी नाशिक जिल्ह्यातुन विविध मान्यवर महिला-पुरुष मान्यवर उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *