विदेशी दारुची बेकायदेशीर रित्या वाहतुक करणा-या इसमावर छापा कारवाई. गुन्हेशाखा युनिट क. १ नाशिक शहरची कामगिरी.
- n
- रंगपंचमीचे दिवशी ड्राय डे असल्याने मद्य विक्रीस बंदी असतांना गुन्हे शाखा युनिट १ च्या पथकाने अवैद्य मध्य विक्री करणाऱ्या वाहनावर कारवाई करत. विदेशी दारुच्या बाटल्या असा एकुण ५ लाख ९८ हजार रुपये किंमतीच्या मुद्देमालासह ताब्यात घेतले आहे. युनिट १ च्या पथकास मिळालेल्या गुप्त माहिती च्या आधारेnऔरंगाबाद रोडवरील जेजुरकर येथील व्ही. एम. मोटर्स कार मॉल जवळ संशयित नवनाथ सावळीराम ढगे ( वय ३४, रा. श्रीधर कॉलनी, नाशिक) यांच्याकडे असलेली लोगान कार क्रमांक एमएच १५ बीएक्स ३९३४ मधील मॅकडॉल नं. १ व्हिस्कीचे १० बॉक्स प्रत्येक बॉक्स मध्ये ४८ या प्रमाणे एकुण ४८० नग सिलबंद काचेच्या विदेशी मद्यच्या बाटल्या व ऑफिसर चॉईस ब्ल्यू विदेशी दारुचे ०३ बॉक्स प्रत्येक बॉक्स मध्ये ४८ नग प्रमाणे एकुण १४४ नग सिलबंद काचेच्या विदेशी दारुच्या बाटल्या अशा एकुण ६२४ नग सिलबंद काचेच्या विदेशी दारुच्या बाटल्या असा एकुण ५ लाख ९८ हजार रुपये किंमतीच्या मुद्देमालासह ताब्यात घेतले. सदर मुद्देमाल कोठुन आणला या बाबत विचारपुस केली असता. सदर मुद्देमाल सुभाषारोड, नाशिकरोड रेल्वेस्टेशन जवळ असलेल्या वासवानी ब्रॅन्डी हाऊस नावाचे दुकानातुन आणल्याची माहिती दिली .nवरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय ढमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार रविंद्र बागुल, प्रवीण वाघमारे प्रदीप म्हसदे, आसिफ तांबोळी, प्रशांत मरकड, मुक्तार शेख, आण्णासाहेब गुंजलाळ, समाधान पवार आगीच्या पथकाने केली.nपोलीस अंमलदार प्रशांत मरकड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आडगाव पोलीस स्टेशन येथे महाराष्ट्र दारुबंदी कायदयांतर्गत कलम ६५ (ई) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. मुद्देमाल आडगाव पोलीसच्या ताब्यात देण्यात आले आहे.
n
