August 7, 2026

जिल्हा षरिषदेचा 90 कोटीचा निधी पडुन

0

 nn nn nnजिल्हा परिषदेला यावर्षी जिल्हा नियोजन समितीकडून प्राप्त झालेल्या ४५१ कोटी रुपयापैकी ८० टक्केच निधी खर्च केला. आर्थिक वर्षाला केवळ १७ दिवसच शिल्लक आहे. यामुळे तब्बल ९० कोटी रुपयांचा निधी पडून आहे. वर्षांत ३६५ दिवस असतानाही जिल्हा परिषदेला एवढा मोठा निधी सत्कारणी लावता आला नसल्याचे चित्र आहेत.nनिधी खर्च करण्यासाठी आता कुठे जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी नुकतीच खातेप्रमुखांची बैठक घेऊन १०० टक्के निधी खर्च करण्याचे खर्चाचा आढावा घेतला. त्यामुळे निधी खर्चाचे नियोजन करण्यासाठी खातेप्रमुखांचीही चांगलीच धावपळ सुरू आहे. जिल्हा नियोजन समितीकडून २०२२-२३ या वर्षात जिल्हा परिषद ४५९ कोटी रुपये नियतव्यय मंजूर झाला आहे. मुख्य कार्यकारी अधिकान्यांनी प्रत्येक आठवड्याला सर्व विभागाप्रमुखांकडून खर्चाचा आढावा घेतला.nनिधी खर्चाच्या बाबतीत काहीही प्रगती होत असल्याचे दिसत नाही. मागील वर्षी जिल्हा परिषदेने वेळेत खर्च न केल्यामुळे ४५ कोटीचा निधी परत गेला होता. यावर्षी त्यापेक्षा अधिक निधी परत जाण्याची चिन्हे दिसत आहेत. ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचा सर्वात कमी म्हणजे ४३ टक्के निधी खर्च झाला. त्या नंतर कृषी (४५ टक्के), आरोग्य (६२ टक्के), महिला व बालविकास (६९टके), बांधकाम विभाग दोन (७१ टक्के) खर्च झाला आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *