सिद्धेश कर्नावट यांना पुरस्कार जाहीर
लोणी:पत्रकार सिद्धेश कर्नावट यांना काव्यमित्र संस्थेच्या वतीने यंदाचा राष्ट्रीय युवा चेतना पुरस्कार जाहीर करण्यात आला. काव्यमित्र संस्था गेली अनेक वर्ण्य पुणे व आसपासच्या परिसरात समाजिक काम करत असून दरवर्षी त्यांच्या वतीने विविध पुरस्कार देखील दिले जातात. कर्नावट यांच्या बरोबर जांबे येथील युवा क्रिडापटू रिद्धी गायकवाड यांना देखील हा पुरस्कार जाहीर करण्यात आला. या बरोबरच संस्थेच्या वतीने राष्ट्रीय सेवागौरव व राष्ट्रीय आदर्श महिला समाज भूषण पुरस्कार देखील जाहीर करण्यात आले. हा पुरस्कार वितरण सोहळा २० मार्च रोजी ऑटो कलस्टर ऑडिटरिअम, चिंचवड येथे होणार असून संस्थेचे अध्यक्ष राजीव सगर यांनी हे पुरस्कार जाहीर केले. दरम्यान एस. टी. स्टॅण्ड. चा पाणी बाटली विक्रेता ते ईलेक्ट्रोनिक मीडियाचा पत्रकार हा प्रवास फार खडतर होता असे पुरस्कार जाहीर झाल्यानंतर सिद्धेश यांनी सांगितले. त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
