October 9, 2026

नाशिकची ओळख आता क्राईम कॅपिटल होतेय : माजी मंत्री छगन भुजबळ

0

nnनाशिक शहराची पौराणिक शहर म्हणून असलेली ओळख वाढत्या गुन्हेगारी मुळे बदलत चालली असून नाशिक आता क्राईम कॅपिटल होतेय. त्यामुळे नाशिकच्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी उपाययोजना करण्यात याव्यात अशी मागणी करत राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी अर्थसंकल्पावरील मागण्यांवर चर्चा करतांना नाशिकच्या गृह, उद्योग, ऊर्जा, जलसंपदासह विविध प्रश्नांवर सरकारचे लक्ष वेधले.nnअर्थसंकल्पावरील मागण्या मांडत असतांना गृह विभागाच्या प्रश्नांवर छगन भुजबळ म्हणाले की, नाशिक शहर धार्मिक, ऐतिहासिक, पौराणिक, महापुरुषांचे शहर म्हणून ओळखले जाते, मात्र अलिकडच्या वर्षांतील गुन्हेगारीची आकडेवारी पाहिली तर लक्षात येईल कि, नाशिक शहर क्राईम कॅपिटल अशी नवी ओळख निर्माण होऊ पाहत आहे. दर दिवसाआड एक खुनाची घटना समोर येत आहे. नाशिक शहरात वर्षभरात ४४५५ गुन्हे दाखल होवून गुन्ह्यांच्या चढत्या आलेखामुळे आणि गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ झाल्यामुळे पोलिसांपुढे आव्हान निर्माण झालेली आहेत. सिडको परिसरात दिवसेंदिवस गुन्हेगारीमध्ये वाढ होत असून नवनवीन टोळ्या उदयास येत आहे. अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हेगारी वाढून दहशत निर्माण झाली आहे. पोलीसांनी आळा घातला पाहिजे अशी मागणी केली.nnनाशिकमध्ये एका तरुणावर दिवसाढवळ्या सराईत गुन्हेगारांकडुन गोळीबार करण्यात आला आहे. वाढत्या गुन्हेगारीमुळे नाशिक शहरातील अंबड पोलीस ठाण्याचे विभाजन करून नवीन ‘एमआयडीसी पोलीस ठाणे’ निर्माण करण्याची शासनाकडे आम्ही मागणी केलेली आहे. गृह विभागाने या प्रस्तावाला ताबडतोब मान्यता देऊन, नाशिक शहरावरील ताण पाहता नविन पोलीस स्टेशनला मंजुरी दिली गेली पाहिजे. पोलीस आयुक्तालयाची हद्दवाढ आणि पोलीस ठाण्यांच्या विभाजनाला लवकरात लवकर शासनाने मंजुरी दिली पाहीजे तसेच पोलीसांचे मनुष्य बळ वाढविण्यात यावे अशी मागणी करत पोलीसांकडे असलेल्या गाड्यांची अवस्था अतिशय वाईट झाली असल्याचे त्यांनी सांगितले. येवला शहर आणि ग्रामीण पोलीस स्टेशनला चांगली वाहने नाही याकडे लक्ष वेधत जर पोलिसांना योग्य सुविधा दिल्या नाही तर ते काम कसे करणार असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *