वीज भरणाच्या नावा खाली महिलेस गंडा
nnवीज बिल भरण्याचा सांगत ग्राहकास ॲप डाऊनलोड करण्यास सांगून त्याद्वारे पासवर्ड मिळवत संशयितांने 2 लाख 13 हजार रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी अज्ञात इसमाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.nफिर्यादी सबा कौसर मोहम्मद वसिम शेख (वय 35, रा. दीप रेसिडेन्सी, अशोका मार्ग, हॅपी होम कॉलनी, नाशिक) असे फसवणूक झालेल्या महिलेचे नाव आहे. फिर्यादी शेख यांना अज्ञात इसमाने दि. 17 जानेवारी 2023 रोजी वीज बिल भरण्याचा बनाव करत संपर्क साधला. वीज वितरण कंपनीची ओळख धारण करून या अज्ञात इसमाने फिर्यादी यांना टीम व्ह्युअर नावाचे रिमोट अॅक्सेस ॲप डाऊनलोड करावयास सांगितले. शेख यांनी हे अॅप डाऊनलोड केले. त्यानंतर या अॅपच्या सहाय्याने अज्ञात इसमाने फिर्यादीच्या फोनचा ॲक्सेस प्राप्त केला. त्यानंतर इंटरनेट बँकिंगचा आयडी व पासवर्ड मिळवून 2 लाख 13 हजार 499 रुपये एवढी रक्कम काढून शेख यांची ऑनलाईन आर्थिक फसवणूक केली. शेख यांनी सायबर पोलीस ठाण्यात अज्ञात इसमाविरुद्ध फसवणुकीची फिर्याद दिली . पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक सूरज बिजली करीत आहेत.
