टोईंगचा ठेका पोलिस आयुक्ताकडून रद्द
n
टोईंगचा ठेका पोलिस आयुक्ताकडून रद्द करण्यात आला आहे. टोइंग ऐवजी नो पार्किंगमधील वाहनांना ई चलनाद्वारे दंड करत कारवाई करण्यात येणार आहे.nशहरात पार्किंगची व्यवस्था नसल्याने नो पार्किंगच्या जागेवर पार्किंग नागरिकांना करावी लागत. या वाहनांवर टोइंग व्हॅन कारवाई होत असल्यानेnवाहने उचलून नेत असल्याने नागरिकांमध्ये नाराजी होती. विशेषतः वाहने उचलताना अत्यंत घाईने व सामान्य नागरिकांनाच त्रास होईल अशा पद्धतीने उचलली जात असल्याने वाहनांचे नुकसान होत असल्याच्या तक्रारी होत होत्या.
nसंपूर्ण शहरात टोइंगचा ठेका असल्याने संबंधित ठेकेदार महात्मा गांधी रोड, शरणपूररोड, सीबीएस कॉलेज रोड ठराविक ठिकाणीच वाहने उचलली जात असल्याच्या तक्रारी होत्या.nnपोलिस आयुक्तालयाने यापूर्वी 7 मार्च 2022 रोजी श्रम साफल्य सर्व्हिसेस यांना वाहने टोइंगसाठी मुदतवाढ दिल्याने आतापर्यंत टोइंग कारवाई होत होती. मात्र पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांनी 15 मार्चपासून टोइंग बंद कारवाईचा आदेश काढला आहे. यामुळे आताnमोटर वाहन कायद्याव्दारे ई- चालानव्दारे दंडात्मक कारवाई होणार असल्याचे पोलिस आयुक्तांच्या आदेशात म्हटले आहे.
