August 9, 2026

नाशिकच्या जलसंपदा विभागाच्या कामावर माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळांनी विचारले प्रश्न*

0

माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी आज विधानसभेत सरकारचे लक्ष वेधले अर्थसंकल्पावरील मागण्यांवर चर्चा करतांना जलसंपदा विभागाच्या प्रश्नांवर सरकारचे लक्ष वेधले जिल्ह्यातील काही दुष्काळग्रस्त तालुके त्याचबरोबर दुष्काळग्रस्त मराठवाडा आणि गिरणा उपखोऱ्यासाठी हे राज्यांतर्गत महत्वकांक्षी प्रकल्प राबविण्याची नितांत आवश्यकता आहे. या भागातील दुष्काळावर मार्ग काढण्यासाठी या योजना राबविणे आवश्यक आहे. शासनाने अर्थसंकल्पात योजना घोषित केली मात्र यासाठी किती निधीची तरतूद करण्यात आली याबाबत माहिती देण्यात आलेली नाही. नाशिकसह मराठवाडा दुष्काळमुक्त करण्यासाठी हे काम अतिशय प्रोडक्टिव्ह असून यासाठी ५० हजार कोटी जरी खर्च लागणार असेल तरी हे काम पूर्ण करा प्रसंगी अधिक कर्ज घ्या अशी मागणी  केली.nnउद्योगांच्या प्रश्नावर ते म्हणाले की, मुंबई पुण्यानंतर नाशिक हे उद्योगांचे डेस्टिनेशन म्हटले जाते. मात्र नाशिकचे उद्योग इतरत्र पळविले जात आहे. नाशिकच्या उद्योगांबाबत अनेक घोषणा करण्यात आल्या आहे. मात्र अद्याप हे उद्योग सुरु होऊ शकले नाही. अंबड औद्योगिक वसाहतीमधील उद्योजकांना अधिक सेस भार लावण्यात येत असल्याने उद्योजकही त्रस्त आहे. त्यामुळे नाशिकच्या उद्योगांबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात येऊन उद्योग वाढी प्रयत्न करावे अशी मागणी त्यांनी यावेळी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *