कॅल्शियम कार्बाइड अथवा चुकीच्या पद्धतीने फळे पिकविताना आढळल्यास कारावाई
nnफळे पिकणे ही नैसर्गिक प्रक्रिया असून ज्यायोगे ग्राहकांना फळे ही खाण्यायोग्य, स्वादिष्ट ,रुचकर आणि पौष्टिक उपलब्ध होतात. त्याचप्रमाणे कृत्रिमरीत्या फळे पिकवणे ही एक अशी प्रक्रिया आहे ज्यामध्ये फळे सुनियंत्रित व कृत्रिमरीत्या पिकवली जातात जेणेकरून ते ग्राहकांना स्वीकार्य होतील त्याशिवाय त्या फळांचे आयुष्यमान वाढविले जाते कृत्रिम रित्या फळे पिकविण्यासाठी आंब्यासारख्या फळांची वाहतूक करणे सुलभ होते जे पिकल्यानंतर मऊ व नाशवंत होतात हे नुकसान टाळण्यासाठी फळे कच्च्या स्थितीत दूरच्या ठिकाणी नेले जातात आणि विक्रीपूर्वी गंतव्य बाजारपेठेत कृत्रिम रित्या पिकवली जातात.nn nnअन्नसुरक्षा व मानके प्राधिकरणाच्या असे निदर्शनास आले आहे की काही फळ विक्रेते/ प्रक्रिया करणारे प्रतिबंधित केलेला कॅल्शियम कार्बाइड चा वापर करतात किंवा निर्दिष्ट केलेला इथलीन वायूच्या स्त्रोतांमध्ये प्रत्यक्ष फळे बुडून पिकवितात त्यामुळे अशी फळे मानवी सेवनास असुरक्षित आहेतnत्यामुळे याद्वारे असे विक्रेते अन्न व्यवसायिक यांना सुचित करण्यात येते की उपरोक्त आदेशाचे कडक पालन करणे बंधनकारक असून प्रतिबंधितद्रव्याचा वापर करण्यास अथवा निर्धारितद्रव्याचा अयोग्य वापर फळे पिकविण्यास करू नये असे करताना निदर्शनास आले तर त्यांचे विरुद्ध अन्नसुरक्षा व मानके कायदा 2011 व नियमानुसार सक्त व गंभीर कारवाई केली जाईल याची नोंद घ्यावीnयापुढे असेही सूचित करण्यात येते की कॅल्शियम कार्बाइड (मसाला ) अथवा चुकीच्या पद्धतीने फळे पिकविताला ग्राहकांच्या निदर्शनास आले तर सदरबाब ही त्या राज्याचे अन्नसुरक्षा आयुक्त किंवा प्रादेशिक संचालक, केंद्रीय अन्न संरक्षा व मानके प्राधिकरण यांचे कार्यालयास कळवावी जेणेकरून अशा प्रकारे नियमाचे उल्लंघन करणाऱ्या वर कारवाई करता येईल सर्व राज्यांच्या अन्नसुरक्षा आयुक्तांचा व प्रादेशिक संचालकांचा तपशील खालील संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आला आहे
