August 7, 2026

उत्पादन शुल्क विभागाच्या कळवण पथकाकडून अवैद्य मद्यसाठा जप्त

0

 nnनाशिक- पिंपळगांव रोडवर, पिपळगांव टोलनाका, पिपळगांव (ब) ता. निफाड जि. नाशिक येथे उत्पादन शुल्क विभागाच्या कळवण विभागाने वाहनांची तपासणी करत असतांना आयशर ट्रक क्रं. एम. एच. ०४. एच.डी. १३१७ च वाहनामध्ये प्लॅस्टिक यान कंपच्या गोण्याचे कवरिंग करुन त्याखाली परराज्यातील विदेशीमद्यसाठा आढळून आला. संशयित वाहनचालक रविशंकर सुखराम पाल यास अटक करण्यात आली . सदर कारवाईत १) रॉयल स्पेशल प्रिमीयम व्हिस्कीच्या १८० मि.ली. क्षमतेच्या एकूण ८८८० सिलबंद बाटल्या. (१८५ बॉक्स, दमण राज्यात निर्मात असुन दादरा नगर हवेली & दमण राज्यात विक्री करीता) २) डिएसपी ब्लॅक डिलक्स व्हिस्कीच्या १८० मि.ली. क्षमतेच्या एकूण २०१६ सिलबंद वाटल्या. (४२ बॉक्स, दमण राज्यात निर्मीत असून दादरा नगर हवेली & दमण राज्यात विक्री करीता ३) वर्ग स्ट्रॉग प्रिमीयम बिअर ५०० मि.ली. क्षमतेचे एकुण १९२० टिन (८० बॉक्स, महाराष्ट्र राज्यात निर्मात असुन दादरा नगर हवेली & दमण राज्यात विक्री करीता) ४) हायवस ५००० सुपर स्ट्रॉंग बिअर ५०० मि.ली. क्षमतेचे एकुण ९६० टिन (४० वॉक्स, महाराष्ट्र राज्यात निर्मात असून दादरा नगर हवेली & दमण राज्यात विक्री करीता) ५) विराबुम सुपर स्ट्रॉंग विअर ५०० मि.ली. क्षमतेचे एकुण ७२० टिन (३० बॉक्स, महाराष्ट्र राज्यात निर्मीत असुन दादरा नगर हवेली & दमण राज्यात विक्री करीता ) ६) प्लॅस्टिक चे यारन कँप च्या गोण्या ७) एक ओपो कंपनीचा अँड्राईड मोबाईल व एक समसंग कंपनीचा साधा मोबाईल ८) एक तपकिरी रंगाची आयशर कंपनीचे प्रो. १९१०XPH मॉडेल सहाचाकी मालवाहतुक वाहन ज्याचा प्रादेशिक परीवहन क्रं. एम.एच.०४, एच.डी. १३१७ असुन वरील नमुद ( एकुण ३७७ बॉक्स) मद्यसाठा सदर वाहनात अवैधरित्या वाहतुक करतांना ३१ लाख ४२, हजार ८४० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सदर गुन्हयातील संशयीत आंतराज्य मद्यतस्कारांचा शोध घेणे सुरु आहे.nnसदर कारवाई निरीक्षक एस. के. सहस्त्रबुध्दे, दुय्यम निरीक्षक एम. बी. सोनार, आर. एम. डमरे, एस. व्ही. देशमुख, जवान सर्वश्री. दिपक आव्हाड, विलास कुवर, एम.सी. सातपुते, पी.एम. वाईकर, सचिन पोरजे, गणेश शेवगे, सोमनाथ भांगरे, दिपक नेमणार, आण्णा बहिरम, गणेश वाघ यांनी यशस्वीरित्या पार पाडली. सदरील गुन्हयाचा तपास एस. के. सहस्त्रबुध्दे, निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क कळवण विभाग जि. नाशिक हे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *