August 7, 2026

आरटीई 25 टक्के ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेला अर्जाला मुदतवाढ

0

 nn nnसन 2023- 24 या शैक्षणिक वर्षाच्या शिक्षण हक्क अधिनियमानुसार दुर्बल व वंचित घटकाकरिता आरटीई 25 टक्के ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेअंतर्गत पालकांना अर्ज करण्यास मुदतवाढ करण्यात आली आहे.nप्राथमिक शिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी दिनाक 25 मार्च रात्री 12 वाजेपर्यंत पर्यंत मुदतवाढ करण्यात आली आहे.nनाशिक मनपा नागरी साधन केंद्र 1 मध्ये 51 तर नाशिक मनपा नागरी साधन केंद्र 2 मध्ये 38 शाळा आहेत. यापैकी दोन शाळांमध्ये नर्सरीसाठी एन्ट्री लेव्हल आहे. अशा नाशिक मनपा क्षेत्रात एकूण 89 शाळांमध्ये 1779 इतक्या जागा उपलब्ध आहेत.nऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी दिनांक 25 मार्च 2023 पर्यंत मुदत आहे. मुदतीत ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन मनपा शिक्षण विभाग प्रशासन अधिकारी सुनीता धनगर यांनी केले आहे. पालकांनी ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी पुढील संकेत स्थळाचा वापर करावा.nगेल्या वर्षाप्रमाणे यंदाही प्रवेशासाठी राज्यस्तरावरून एकच सोडत जाहीर होईल. शाळेत आरटीई अंतर्गत उपलब्ध जागा एवढी एक प्रतीक्षा यादी तयार केली जाईल. प्रवेशासाठी एक नियमित फेरी राबविली जाईल. त्यानंतर जागा रिक्त राहिल्यास टप्याटप्याने प्रतीक्षा यादीनुसार प्रवेश होतील. पालकाने एकाच पाल्याचे एकापेक्षा जास्त अर्ज भरल्यास एकही अर्ज लॉटरीसाठी ग्राह्य धरला जाणार नाही.nनिवासी पुराव्यासाठी शिधापत्रिका, वाहन चालवण्याचा परवाना, वीज, दूरध्वनी देयक, मिळकत कर देयक, आधार कार्ड, मतदान ओळखपत्र,पारपत्र, राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक इ. भाडेतत्वावर राहणाऱ्या पालकांकरिता भाडेकरार हा दुय्यम निबंधक कार्यालयाचा नोंदणीकृत असावा. भाडेकरार हा अर्ज भरण्याचा दिनांका पूर्वीचा असावा.nअर्ज सादर करताना जमा करावयाच्या कागदपत्राची माहिती पालकांनी योग्य पद्धतीने जाणून घेणे गरजेचे आहे. शासनाच्या संकेतस्थळावर याबाबत सविस्तर माहिती उपलब्ध आहे. तरी पालकांनी त्याचा लाभ घ्यावा.nमनपा शिक्षण विभागाअंतर्गत दोन मदत केंद्र सुरु आहेत.n1) नागरी साधन केंद्र 1, समग्र शिक्षा अभियान कार्यालय, पोलीस मुख्यालय, गंगापूर रोड, नाशिक संपर्क क्र. 0253- 2951118 सुनीता जाधव 7385576195,n(2) नागरी साधन केंद्र 2, समग्र शिक्षा अभियान कार्यालय, मनपा शाळा क्र. 55, जेतवन नगर, जय भवानी रोड, नाशिक रोड, नाशिक संपर्क क्र. 0253- 2415200 मंजुषा कापसे 7020362248, 9822060844n……………………………..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *