August 7, 2026

गहाळ झालेले मोबाईल मुळ मालकांना परत

0

चोरीस गेलेल्या किंवा गहाळ झालेल्या मोबाइलचा शोध घेण्यास उपनगर पोलिसांना यश आले आहे.nउपनगर पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या गहाळ मोबाइलचा शोध घेत ९० हजार रुपये किमतीचे सहा मोबाईल परत मिळवत. ते मूळ मालकांना परत देण्यात आले.nविविध घटनांमध्ये मोबाइल गहाळ होण्याच्या घटना वाढीस लागल्याने नागरिकांना विविध अडचणींना तोंड द्यावे लागायचे. याबाबतच्या तक्रारी वाढल्यानंतर पोलिस आयुक्त अंकुश शिंदे, उपायुक्त (परिमंडळ दोन ) चंद्रकांत खांडवी, सहायक आयुक्त (नाशिकरोड विभाग) भुसारे यांनी गहाळ झालेल्या मोबाइलचा शोध घेऊन ते मूळ मालकांना परत देण्याच्या सूचना केल्या होत्या.nउपनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक नीलेश माईनकर, तांत्रिक विश्लेषण विभागाचे वरिष्ठ निरीक्षक सूरज बिजली यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक सतीश घोटेकर, उपनिरीक्षक विकास लोंढे, पोलिस नाईक सोमनाथ गुंड, राहुल जगताप, गौरव गवळी, जयंत शिंदे, प्रमोद आभाळे, गणेश रूमाले, अमोल टर्ले आदीच्या पथकाने तपास केलाnn


nn 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *