भेंडाळी गाव परिसरातील चोऱ्यां थांबवा पोलिस अधीक्षकांना निवेदन
निफाड तालुक्यातील भेंडाळी गाव व परिसरात चोऱ्यां व अवैध धंदे चा प्रमाण वाढल्याने रहिवाशी त्रस्त झाले आहेत.nभेंडाळी गाव व भेंडाळी फाटा परिसरात चोऱ्यांचे प्रमाण खूप वाढले आहे. आजपर्यंत भेंडाळी गाव परिसरात असलेल्या १५ ते २० दुकाने व ५ ते ६ घरे फोडून त्यातील वस्तूंची, दागिने तसेच रोख पैसे असे लाखो रुपयांची चोरी केली गेली आहे. त्यामुळे उद्योजक तसेच ग्रामस्थांच्या मनात भीतीचे वातावरण तयार झाले आहे. आजपर्यंत एकाही वेळेस सदर चोर पकडले गेले नाही. त्यामुळे सदर चोऱ्या थांबविण्यासाठी पोलिस अधीक्षक शहाजी उमाप यांना निवेदन देत चोरांनी व अवैद्य धंदे थांबवण्याची मागणी केली आहे. सायखेडा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक यांच्या बदली चा मागणी करण्यात आली आहे
