August 8, 2026

दुचाकी चोरटयांना 3 वर्ष कारावासाची शिक्षा

0

दुचाकी चोरी करणाऱ्या दोघांना न्यायालयाने तीन वर्षे कारावास व प्रत्येकी १५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली  आहे. अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी ( कोर्ट क्रमांक ०८) प्रतिभा पाटील यांनी  निकाल दिला. सरकारतर्फे सहायक सरकारी अभियोक्ता  एस. एस. यांनी युक्तिवाद केला.अभियोग कक्षा दिलेल्या माहितीनुसार, १४ सप्टेंबर २०२१ रोजी अपोला हॉस्पिटलसमोरील उड्डाणपुलावर रात्री १२.३० वाजता ही घटना घडली होती. हानिफ उस्मान शेख (रा. घर नं. ३०४९, चौकमंडई, जुने नाशिक) यांनी रस्त्याच्या कडेला पार्क केलेली सुझुकी दुचाकी  (एमएच १५ – जीजे ५१२६) चोरीला गेली होती. याप्रकरणी पोलिसांनी मोईन अन्वर खान (वय २४ रा. साईदर्शन अपार्ट. फ्लॅट नं. २१, पखालरोड नासर्डी नदीजवळ), तोफीक नसिर खान (वय २६) यांना पोलिसांनी  अटक केली.  सदर गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखेच्या युनिट एकचे उपनिरीक्षक विष्णू उगले यांनी करत न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. न्यायालयीन सुनावणीदरम्यान आरोपीविरुद्ध फिर्यादी, साक्षीदार, पंच यांनी दिलेली साक्ष व चितळकर तपासी अंमलदार यांनी सादर केलेल्या परिस्थितीजन्य पुराव्यास अनुसरून आरोपींना भादंवि कलम ३७९, ३४ मध्ये ३ वर्षे साधा कारावास व प्रत्येकी पाच रुपये दंड, दंड न भरल्यास २ महिने साध्या कारावासाची शिक्षा. तसेच भादंवि कलम ४७१ मध्ये २ वर्षे साधा कारावास व प्रत्येकी १० हजार रुपये दंड, दंड न भरल्यास ३ महिने साध्या कारावासाची शिक्षा सुनावलेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *