August 7, 2026

दान पेटी चोरणारे अटकेत

0

नाशिक : आडगावnn nnशिंदे वस्ती आडगाव शिवार धोंडीवीर महाराज मंदिर समोर असलेली लोखंडी दानपेटी अज्ञात चोरट्याने 16 ते 17 मार्च तारखेच्या दरम्यान चोरी करून घेऊन गेले होते. या प्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.nवरिष्ठ पोलिस निरीक्षक इरफान शेख यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे दिनेश गुंबाडे व निखिल वाकचौरे आदीच्या पथकाने पेट्रोलिंग करत असतांना आडगाव गावात एक काळ्या रंगाच्या दुचाकीवर तीन इसम संशयितरित्या फिरत असताना दिसले . त्यांना पोलिसांनी थांबविण्याचा इशारा करताच. संशयित पळू लागल्याने त्यांना पकडून विचारपूस केली असता . संशयितnजगदीश बाळू चोथवे (वय 27 वर्ष धंदा-मजुरी रा. वाल्मिकनगर, कोकणगाव रोड, कसले सुर्कने ता. निफाड जि.नाशिक ) , हेमराज लक्ष्मण मोरे ( वय 22 वर्ष धंदा मजुरी रा. ओने सुकेने ता. निफाड) , किरण विठ्ठल शेवरे (वय 23 वर्ष धंदा मजुरी रा. ओने घुगे वस्ती, सुकेने ता. निफाड जि.नाशिक) यांनी गुन्ह्याची कबुली दिली . रोख रक्कम, गुन्ह्या मध्ये वापरलेली काळ्या रंगाची मोटर सायकल, एक लोखंडी पहार, एक स्क्रू डायव्हर व दोन मोबाइल असा एकूण 89 हजार 756/- रु किमतीचा मुद्देमाल ताब्यात घेऊन गुन्हा उघडकीस आणला. न्यायालयात हजर केले असता मा. न्यायालयाने 1 दिवसाची पोलिस कोठडी देण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *