August 7, 2026

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचे ओएसडी मंगेश चिवटे यांनी वीरमातेच्या कुटुंबियांशी साधला संवाद

0

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचे ओएसडी मंगेश चिवटे यांनी वीरमातेच्या कुटुंबियांशी साधला संवादnमुंबई : कर्तव्यदक्ष महिलेला भक्कम पाठिंबा देणाऱ्या त्यांचा कुटुंबीयांचे कौतुक करून आपणास अशा कणखर आईचा व आपल्या सर्वांचा अभिमान असल्याचे स्विय सहायक व मुख्यमंत्री कार्यालयाचे विशेष कार्यकारी अधिकारी मंगेश चिवटे यांच्यामार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.nएकीकडे मातृत्व, तर दुसरीकडे कर्तव्य अशी जबाबदारी पार पाडत भारतीय सीमा सुरक्षा दलामध्ये कर्तव्य निभावणाऱ्या दऱ्याचे वडगाव (ता. करवीर) येथील वर्षा रमेश मगदूम- पाटील या प्रसूती व बालसंगोपन रजा संपल्यानंतर १० महिन्यांच्या चिमुरड्याला घरी ठेवून कर्तव्यावर काल रूजू झाल्या. त्याचे वृत्त ‘लोकमत’ने दिले होते. वृत्तपत्रांना दिलेल्या बातमी पाहून तसेच सोशल मीडियावरील व्हिडिओ पाहून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वर्षा पाटील यांचे कौतुक केले. मंगेश चिवटे यांनी व्हिडिओ कॉलद्वारे मुख्यमंत्र्यांनी वर्षा पाटील यांचे कौतुक केल्याचे सांगत त्यांच्या कुटुंबीयांशी संवाद साधला तसेच वर्षा निवासस्थानी चहापाण्याचे निमंत्रण ही दिले. हा संवाद सागर कांबळे (कांचनवाडी) यांनी घडवून आणला. याप्रसंगी वर्षाचे पती रमेश, आई, वडील, भाऊ विनायक, भावजय आदी परिवार उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *