August 7, 2026

तरुणावर पुर्व वैमस्यातुन जीवघेणा हल्ला

0

 nn nnनाशिक : सातपुरnnसातपूर येथील कार्बन नाका परिसरात एका तरुणावर पुर्व वैमस्यातुन जीवघेणा हल्ला केला . तिघां संशयितांनी कोयत्याने वार व गोळीबार केल्याचे समजते आहे . मारेकऱ्यांनी त्यांचे चारचाकी वाहन घटनास्थळी सोडून देत एका कामगाराला बंदुकीचा धाक दाखवत त्याची दुचाकी घेऊन फरार झाले . रविवारी (ता. 19) दुपारच्या सुमारास घडली. तपन जाधव आपल्या चारचाकी हे एम एच 04 ई एक्स 5678 प्रवास करत असताना कार्बन नाका परिसरात आशिष जाधव आपल्या 2 साथीदारांसह एम एच 15 डीएम 7639 या वाहनातून येत तपनच्या गाडीला धडक दिली.nयानंतर गाडीखाली उतरत त्याच्यावर कोयत्याने वार केले व गोळीबार केला.nतिघांनी केलेल्या या हल्ल्यात तपन जाधव गंभीर जखमी झाल्याने त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या घटनेनंतर धडक बसल्याने संशयितांची गाडी बंद पडल्याने या रस्त्याने जात असलेल्या गौतम शार्दुल कामगाराला संशयितांनी थांबवत. बंदूकीचा धाक दाखवत त्या कामगाराची दुचाकी एम एच 15 एफयु 7656 घेऊन घटनास्थळावरुन पळून गेले.nघटना स्थळी सातपुर पोलिसांनी पोहचत संशयित आरोपींचा शोध घेत आहेत. या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी उपायुक्त चंद्रकांत खांडवी, सहाय्यक आयुक्त सोहेल शेख, विजय ढमाळ यांनी पाहणी करत तपासा संदर्भात सुचना केल्या. संशयित आरोपीच्या गाडीमध्ये कोयते आणि मिरची पावडर मिळून आले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *