October 8, 2026

महाडच्या सत्याग्रहा दिनानिमित्त अभिवादन

0

नाशिक – महाडचा सत्याग्रह हा मानव मुक्तीसाठी प्रतीकात्मक सत्याग्रह होता. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या देशातील विषमते विरुद्ध केलेला हा सत्याग्रह स्वाभिमान आणि न्याय हक्क यांच्यासाठी महत्त्वाचा ठरतो. सर्वच जाती, जमाती, धर्मपंथ यात भेदाभेद असू नये असा संदेश या सत्याग्रहातून दिला गेला. त्यामुळे मानव तितुका एक हा विचार या ऐतिहासिक सत्याग्रहातून समाजात निर्माण झाला, असे विचार लेखक शंकर बोऱ्हाडे यांनी महाड सत्याग्रहाच्या स्मरण प्रसंगी व्यक्त केले. लोकहितवादी मंडळाचे अध्यक्ष मुकुंद कुलकर्णी यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून प्रतिकात्मरीत्या सर्व जाती गटातील नागरिकांनी एकत्र पाणी पिऊन महाड सत्याग्रहाची ऐतिहासिक आठवण जागविली. आरोग्य सेवक दीपक डोके यांनी आयोजित केलेल्या या कार्यक्रमास सार्वजनिक वाचनालयाचे सहकार्यवाह अँड. अभिजीत बगदे, गिरणा गौरव प्रतिष्ठानचे सुरेश पवार, लोकहितवादी मंडळाचे उपाध्यक्ष संजय करंजकर, नंदकिशोर आघारकर ,प्रसिद्ध विधीज्ञ रमेश कुशारे ,राजू मोरे ,प्रकाश अल्हाटे, बंटी नेवारे, उत्तम जाधव, चैतन्य गांगुर्डे ,आकाश सदावर्ते, यांचे सह आधी उपस्थित होते कार्यक्रमाचे संयोजन आरोग्य सेवक दीपक डोके यांनी केले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *