August 7, 2026

नाशकात चाललंय तरी काय कार्बन नाका परिसरात केक दुकानचालकांवर हल्ला

0

*सातपूर कार्बन नाका परिसरात कोयता गँगची बेकरी चालकाला मारहाणnnनाशिक : सातपुरnnशहर परिसरात सध्या खुलेआम कोत्या सारख्या हत्याराने वार करण्याच्या घटना घडत आहे. यामुळे जनमाणसामध्ये भिंतीचे वातावरण निर्माण झाले आहे . गेल्या आठवड्याभरापुर्वी सातपुर परिसरातील कार्बन नाका परिसरात वाहनाला गाडी आडवी लावत गोळीबार करत प्राणघातक हल्ला करण्यात आला होता. यानंतर याच कार्बन नाका परिसरात शनिवारी (दि 25) अभिषक बेकरी मध्ये केक घेण्यासाठी आलेल्या संशयिताने पैसे न देण्याच्या कारणावरून बेकरी चालकांशी हूज्जत घालत वादवाद केला. यानंतर संशयितांने टोळक्यांस बोलावून बेकरी चालकावर व बेकरीतील कामगारांना धमाकावत कोयत्याचा वार करण्याचा प्रयत्न करण्यात आला.nnसर्व प्रकार CC टीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. ह्या सर्व प्रकरणाची माहिती अभिषेक बेकरीचे मालक अनिकेत सुरेश जाधव यांनी सातपूर पोलिसात तक्रार दाखल केली आहे.nया घटने प्रकरणी सातपूर पोलिसांनी चार जणांना ताब्यात घेतले आहे. पुढील तपास सातपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार आहेर हे करीत आहेत.nnम्हसरुळ परिसरातील शालेय विद्यार्थ्यांवर हल्लीची घटना घडली. दोन दिवसापूर्वी पाथर्डी फाटा परिसरातील आंगण हॉटेल येथे एका कंपनीच्या मॅनेजरची गाडी अडवून त्याची भर रस्त्यात प्राणघातक शस्त्रांनी हत्या करण्यात आली.nnपंचवटीत होळीच्या दिवशी एका युवकाचा पाठलाग करीत गळा चिरून हत्या करण्यात आली होती,. फुलेनगर परिसरात सराईत गुन्हेगारांनी गावठी कट्ट्यातून गोळीबार करीत फुलेनगर येथील एका महिलेला जखमी केले होते.nअशाया प्रकारच्या घटनांनी शहरातील कायदा सुव्यवस्थेचे अक्षरशः धिंडवडे निघाले आहेत. एव्हढे गंभीर प्रकार घडूनही पोलीस यंत्रणेकडून पाहिजे तशी ठोस पावले उचलली जात नसल्याचे चित्र निर्माण झाले आहे. एका यासर्व घटनानी शहर परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *