आडगाव गुन्हेशोध पथकाची कामगीरी दोन चोरटयांना अटक
आडगाव गुन्हेशोध पथकाची कामगीरी दोन चोरटयांना अटकnnनाशिक : आडगावnnआडगाव पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने सीसीटीव्ही फुटेच्या आधारे तपास करत. भद्रकाली परिसरातुन दोन संशयितांना अटक केली आहे. त्यांच्या कडून चोरीचे ०३ गुन्हे व घरफोडीचा ०१ गुन्हा उघडकीस आणला आहे.nसंशयित कैलास नंदु गायकवाड (वय २० वर्षे, रा. साईबाबा मंदिर जवळ पंचशीलनगर गंजमाळ, नाशिक) यास ताब्यात घेतले असता. त्याचा साथीदार रोशन सुधाकर कटारे (वय २२ वर्षे, रा. मालुबाई यांचे दुकानामागे, कामगारनगर, अमृतधाम ) यांनी फिर्यादी नानासाहेब बाबुराव गुरुळे (वय ५० वर्ष, धंदा-नोकरी, रा. प्लॉट नं. २४, सर्वानंद निवास, सरस्वतीनगर, पंचवटी) यांच्या राहत्या घराच्या कंपाउंड मध्ये गॅस टाक्याची चोरी केली होती.nआडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. होता. वरिष्ठ पोलीस निरीक्षक इरफान शेख यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आला. संशयितांकडून ०७ गॅस सिलेन्डरच्या टाक्या, गुन्हात वापरलेली दुचाकी असाn३२ हजार रुपये किमतीचा माल हस्तगत करण्यात आला आहे. गॅस सिलेन्डरच्या टाक्या कुठुन चोरल्या होत्या. या बाबत तपास चालू आहे. इतर साथीदारांचा शोध घेण्यात येत आहे.nसदरची कामगीरी गुन्हेशोध पथकाचे सहायक पोलिस निरीक्षक हेमंत तोडकर, सपोउनि / भास्कर वाढवणे, पोहवा / सुरेश नरवडे, पोना / देवराम सुरंजे, पोना/ निलेश काटकर, व पोना / वाघ, व पो. अंमलदार / दिनेश गुंबाडे, निखिल वाघचौरे, कुंदन राठोड, अमोल देशमुख आधीच्या पथकाने केली.
