August 8, 2026

शहरातील वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या

0

 nnनाशिक : शहरnnशहरातील वाढत्या गुन्हेगारी पार्श्वभूमी पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांनी  पोलिस आयुक्तालयाच्या शहरातील वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या प्रशासकीय कारणास्तव  बदल्या केल्या आहेत. यात  अंबड पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकपदी नुकतीच नियुक्ती  झालेल्या युवराज पत्की यांची मुंबई नाका पोलीस ठाण्यात नियुक्ती करण्यात आली.   सायबर गुन्हे शाखेचे सूरज बिजली यांची अबंड पोलिस ठाण्यात  नियुक्ती करण्यात आली आहे  . सातपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र चव्हाण  यांच्या जागी उपनगर पोलीस ठाण्याचे पंकज भालेराव यांना संधी देण्यात आली आहे.  पंचवटी पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ निरीक्षकपदी नाशिकरोड पोलीस ठाण्याचे अनिल शिंदे यांना नियुकती  देण्यात आली आहे.  गणेश मधुकर न्याहदे यांना इंदिरानगर पोलीस ठाण्याचा पदभार देण्यात आला आहे.   देविदास वांजळे यांची नाशिकरोड पोलीस ठाण्याचा पदभार देण्यात आला आहे. इंदिरा नगर चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय बांबळे यांची विशेष शाखेत बदली करण्यात आली आहे. पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डाँ सीताराम कोल्हे यांची बदली सायबर क्राईम शाखेत नियुक्ती करण्यात आली.  नियंत्रण कक्षातील महिला पोलीस उपनिरीक्षक अपेक्षा जाधव यांना चुंचाळे पोलीस चौकीत, तर आर्थिक गुन्हे शाखेचे दुय्यम पोलीस निरीक्षक अशोक शरमाळे यांना चुंचाळे पोलिस चौकी पोलीस निरीक्षक पदी नियुक्ती देण्यात आली आहे. अभियोग कक्षाचे वरिष्ठ निरीक्षक पवन चौधरी यांची नाशिकरोड पोलीस ठाण्याच्या दुय्यम निरीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांच्या आदेशान्वये या सर्व नियुक्त्या तात्पुरत्या स्वरूपात करण्यात आल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *