बाजार समित्यांसाठी आजपासून उमेदवारी अर्ज दाखल होणार
जिल्ह्यातील बाजार समित्यांच्या निवडणुकीसाठी सोमवार (दि.२७) पासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास प्रारंभ होणार आहे. १४ बाजार समित्यांसाठी इच्छुक उमेदवार नामनिर्देशनपत्र अर्ज दाखल करू शकणार आहेत.nnयेत्या ३ एप्रिलपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. ५ एप्रिलला छाननी तर ६ एप्रिल रोजी- उमेदवारांची यादी जाहीर केली जाईल. २८ व ३० एप्रिल अशा दोन टप्प्यांत मतदान प्रक्रिया पार पडेल. २८ एप्रिलला नाशिक, पिंपळगाव बसवंत, घोटी, येवला, मालेगाव, चांदवड, देवळा, कळवण, सुरगाणा, दिंडोरी, सिन्नर, नांदगाव या समित्यांसाठी तर दुसऱ्या टप्प्यात लासलगाव आणि मनमाड बाजार समितीसाठी ३० एप्रिलला मतदान व त्याच दिवशी मतमोजणी होणार आहे.
