August 7, 2026

पोलिसांची शहरात काँम्बिंग कारवाई

0

पोलिसांची शहरात काँम्बिंग कारवाईnनाशिक : शहरnशहरात वाढत असलेल्या गुन्हेगारी च्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी कारवाईस सुरुवात केली आहे. शहरातील १३ पोलीस ठाणे हद्दीतील १९ ठिकाणी कोबींग ऑपरेशन राबवत कारवाई करण्यात आली. सोमवारी रात्री दोन वाजेपर्यंत हे ऑपरेशन सुरू होते. गुन्हेगारांमध्ये वचक निर्माण करण्यासाठी मदत होणार आहे.nपोलिस ठाणे निहाय हद्दीतील रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार, हिस्ट्रीशिटर असे एकूण १५७ गुन्हेगार तपासले. एकूण ९० गुन्हेगार सापडले. पोलीस आयुक्तांच्या आदेशानुसार शहरातून हद्दपार करण्यात आलेल्या एकूण 36 आरोपींची देखील पोलिसांनी कसून चौकशी केली. मात्र ते मिळून आले नाहीत. त्यामुळे कारवाई प्रमाणे ते हद्दीबाहेर असल्याचे दिसून आले. तर महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ११२, ११७ प्रमाणे २९ टवाळखोर तसेच अजामिनपात्र वॉरंट मधील ११ लोकांवर करवाई करण्यात आली.nभारतीय हत्यार कायदयाचे उल्लंघन करणाऱ्या एका विरूध्द अंबड पोलीस ठाणे येथे कोम्बिंग ऑपरेशन दरम्यान कारवाई करण्यात आली आहे. पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली 3 पोलीस उपआयुक्त, ४ सहा. पोलीस आयुक्त, सर्व पोलीस ठाणे प्रभारी, पोलीस ठाण्याचे ४२ पोलीस अधिकारी व २३६ पोलीस अंमलदार तसेच गुन्हेशाखा युनिट १ व २ प्रभारी अधिकारी तसेच गुन्हेशाखा युनिटचे अधिकारी व पोलीस अंमलदार आदीनी कोम्बिंग ऑपरेशनमध्ये सहभाग घेतला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *