मनपाने केली १८० कोटी रुपयांची बिले पास
मनपाने केली १८० कोटी रुपयांची बिले पासnनाशिक : मनपाnनाशिक महापालिकेला आर्थिक वर्ष संपण्याच्या शेवटच्या आठवड्यात तब्बल १८० कोटींचे बिले अदा करावी लागली. ठेकेदारांनी जवळपास सातशे बिले पालिकेला सादर केल्यानंतर त्यातून पालिकेने ठेकेदारांचे १८० कोटी रुपये अदा केले आहेत.nआर्थिक वर्ष संपण्याचा शुक्रवार हा शेवटचा दिवस होता. त्यामुळे मार्चअखेर महापालिकेची ठेकेदारांची बिले काढण्यासाठी चांगली धावपळ उडाली होती.nकेवळ दोन वर्षांतच रस्त्यावर सातशे कोटींची उधळपट्टी केली होती. त्यामुळे पालिकेचे दायित्व गेल्या वर्षी अडीच हजार कोटींपर्यंत पोहोचले होते. तत्कालीन आयुक्त रमेश पवार यांनी अनावश्यक कामे रद्द केली होती. दुसरीकडे ‘बीओटी’सारख्या योजनेतून ४०० कोटी रुपयांचा अपेक्षित महसूल न मिळाल्यामुळे महापालिकेची कोंडी झाली. सर्वसाधारणपणे दिवाळी व मार्च महिनाअखेरीस बिलांसाठी ठेकेदार गर्दी करीत असतात. शेवटच्या आठ दिवसांत ठेकेदारांनी तब्बल सातशे देयके सादर केली होती. त्या बिलांपोटी महापालिकेने शेवटच्या आठवड्यात ठेकेदारांना तब्बल १८० कोटी रुपये अदा केली.
