October 7, 2026

ग्रीनच्या जिमच्या कंत्राट मध्ये अपहार भद्रकाली पोलिसांत गुन्हा दाखल

0

ग्रीनच्या जिमच्या कंत्राट मध्ये अपहारnभद्रकाली पोलिसांत गुन्हा दाखलnnनाशिक : मनपाnमहापालिकेच्या ग्रीन जिम ‘चे कंत्राट मिळवण्यासाठी शासकीय मोहर आणि प्रमाणपत्र सादर झाल्याची धक्कादायक माहिती आहे. जिल्हा क्रीडा कार्यालयाच्या पडताळणीत ही बाब उघड झाली. त्यानुसार ९ कोटी २३ लाखांचा अपहार केल्यामुळे ‘सॅमसन इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड नाशिक’ या कंपनीवर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला. याप्रकरणी भद्रकाली पोलिस तपास करीत आहेत.nnजिल्हा क्रीडा अधिकारी सुनंदा शाळीग्राम पाटील यांनी याप्रकरणी भद्रकाली पोलिसांत फिर्याद दिली. २३ मार्च ते १ एप्रिल २०२३ या कालावधीत संबंधित कंपनीनेnगैरव्यवहार केल्याचे पडताळणीत समोर आले. महापालिकेच्या ग्रीन जिम चे कंत्राट मिळवण्यासाठी कंपनीतर्फे अर्ज करण्यात आला होता. त्यासाठी क्रीडा अधिकारी कार्यालयाची बनावट मोहर व खोटे अनुभव प्रमाणपत्र सादर करण्यात आले. यासंदर्भात जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाकडे प्राप्त तक्रार अर्जाची चौकशी करण्यात आली. या चौकशीअंती हे कागदपत्रे बनावट असल्याची माहिती उघड झाली. या प्रकरणात भद्रकाली पोलिसांतर्फे कागदपत्रांच्या तपासणीसह कंपनीमालक व ठेकेदारांची जबाब नोंदणी होईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *