August 8, 2026

नाशिक बाजार समितीच्या आखाड्यात १७५ अर्ज दाखल

0

नाशिक बाजार समितीच्या आखाड्यात १७५ अर्ज दाखलnनाशिक : जिल्हाnnनाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या १८ जागांसाठी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी सोमवारी (दि. ३) ९०, तर यापूर्वी ८५ असे एकूण १७५ इच्छुकांनी अर्ज दाखल केले. ५ एप्रिलला छाननी असून, २० एप्रिलपर्यंत माघारी आहे. पॅनलनिर्मितीबरोबर प्रचाराला वेग येणार आहे.nnनाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. २७ मार्चपासून अर्ज दाखल करण्यास प्रारंभ झाला होता. कोणतीही निवडणूक नसल्याने यंदा इच्छुकांची संख्या मोठी आहे. आतापर्यंत १७५ अर्ज दाखल झाले आहेत. माजी खासदार तथा माजी सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती देवीदास पिंगळे,बबन घोलप, विजय करंजकर यांच्यासमोर खासदार हेमंत गोडसे, शिवाजी चुंभळे, दिनकर पाटील यांच्या पॅनलमध्ये लढत होईल.nnशेवटच्या दिवशी सहकारी संस्था मतदारसंघ गटात ५०, पंचायत मतदारसंघ गटात ३०, व्यापारी मतदारसंघ गटात दहा अर्ज प्राप्त झाले. त्यात संपत सकाळे, मनपाचे माजी स्थायी सभापती गणेश गिते, माजी नगरसेवक गोकुळ पिंगळे, निवृत्ती अरिंगळे, शरद सानप, विनायक माळेकर, कल्पना चुंभळे, संदीप पाटील, योगेश सकाळी , विमल चुंद्रे आदी चा समावेश आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *